आपल्या कारकिर्दीत १३ हजारहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर म्हणाले की, “फलंदाजी करताना त्यांनी कधीही धावफलकाकडे पाहिले नाही आणि दुसरे म्हणजे त्यांनी कधीही खेळपट्टीवर लक्ष्य ठेवले नाही.” भारताच्या माजी कर्णधाराने पुढे असेही सांगितले की, “कसोटी सामन्यातील त्याचे ध्येय नेहमी खेळाच्या सुरुवातीपासून ते यष्टीमागे फलंदाजी करणे हे होते.
एबीपी ग्रुपने आयोजित केलेल्या इन्फोकॉम २०२२ च्या ‘स्पॉटलाइट सेशन’मध्ये गावसकर म्हणाले, “जेव्हा मी फलंदाजी करत होतो, तेव्हा मी कधीही स्कोअरबोर्डकडे पाहिले नाही कारण प्रत्येक फलंदाजाची लक्ष्य सेट करण्याची स्वतःची पद्धत असते.” लहान उद्दिष्टे हे प्रशिक्षक तुम्हाला प्रथम सांगतात. १०, २० आणि ३० धावांपर्यंत पोहोचणे, हा एक चांगला दृष्टीकोन आहे.
“मी ज्या प्रकारे पाहत होतो, माझे लक्ष्य ३० पर्यंत पोहोचण्याचे असेल, जेव्हा मी २४-२५ च्या आसपास कुठेही पोहोचलो, तर मी खूप काळजीत असेन आणि ३० पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन. मग मी ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू खेळायचो, चौकार मारण्याचा प्रयत्न करायचो, २६ च्या आसपास बाद व्हायचो, पण तो चौकार मारल्यामुळे मी ३० धावांपर्यंत पोहचलो आणि मी तसा विचार करण सोडून दिलं.”
गावसकर म्हणाले की, “विशिष्ट लक्ष्याचा पाठलाग करण्याचा दबाव कमी करण्यासाठी प्रत्येक चेंडू स्वतःच्या गुणवत्तेनुसार खेळला पाहिजे. एक रंजक किस्सा शेअर करताना गावसकर म्हणाले की, सर डॉन ब्रॅडमनच्या २९व्या कसोटी शतकाची बरोबरी केव्हा केली ते मला कळले नाही कारण त्यांना धावफलक पाहण्याची सवय नव्हती.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “दिलीप वेंगसरकर याने येऊन मला या कामगिरीबद्दल सांगेपर्यंत मला काहीच कल्पना नव्हती.” गावसकर यांनी १९८३ मध्ये नवी दिल्लीत वेस्ट इंडिजविरुद्धच्या २९ कसोटी शतकांच्या ब्रॅडमनच्या विक्रमाची बरोबरी केली. प्रत्येक वेळी फलंदाजी करताना शतक करणे हेच आपले ध्येय असल्याचे गावसकर म्हणाले.
“मी माझ्या विकेटवर ठेवलेले बक्षीस नेहमीच १०० धावा होत्या. मला नेहमी शतक झळकावायचे होते, किमान तेवढे तरी धावा मिळवायच्या होत्या… साहजिकच ते अशक्य होते, सर डॉन ब्रॅडमनसुद्धा प्रत्येक डावात ते करू शकत नव्हते. त्यामुळे माझे संपूर्ण लक्ष सत्रात फलंदाजीवर होते. पहिल्या सत्रापासून दुपारच्या जेवणापर्यंत, नंतर चहापर्यंत आणि नंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत.” असे ते पुढे म्हणाले.