ब्रिस्बेन : सचिन तेंडुलकरने २००४मध्ये सिडनी येथे खेळलेल्या २४१ धावांच्या खेळीतून प्रेरणा घेत ‘ऑफ स्टम्पच्या’ बाहेरील चेंडूंवर कव्हर ड्राइव्ह खेळणे टाळावे, असा सल्ला माजी कसोटीपटू सुनील गावस्कर यांनी फलंदाजीत संघर्ष करत असलेल्या विराट कोहलीला दिला. ब्रिस्बेन कसोटीत पावसाने प्रभावित तिसऱ्या दिवशी कोहली पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यास अपयशी ठरला. त्याला जोश हेझलवूडने बाद केले. कोहलीने सध्याच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आतापर्यंत ०५, नाबाद १००, ०७, ११ आणि ०३ अशा धावा केल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘‘कोहलीला आपला आदर्श सचिन तेंडुलकरकडे पाहण्याची गरज आहे. त्याने आपल्या ‘ऑफ साइड’च्या फटक्यांवर धैर्य व नियंत्रण ठेवत सिडनीत २४१ धावा केल्या. त्याने ‘ऑफ साइड’च्या कव्हर क्षेत्रात एकही फटका मारला नाही. कारण, तो यापूर्वी ‘कव्हर’मध्ये खेळण्याच्या प्रयत्नात बाद होत होता. त्याचे जवळपास सर्वचे फटके हे ऑन साइडला होते,’’ असे गावस्कर यांनी सांगितले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil gavaskar says virat kohli should take inspiration from sachin tendulkar sports news amy