Sunil Gavaskar Says We have Viratball to counter Bazball : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. ज्यासाठी इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २५ जानेवारीपासून हैदराबादमध्ये सुरु होणार आहे. ज्यासाठी टीम इंडिया आता जोरदार तयारी करत आहे. या मालिकेत दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. इंग्लंड आता कसोटीमध्ये बॅझबॉल’ क्रिकेट खेळतो, यात इंग्लंड संघाचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम आणि कर्णधार बेन स्टोक्स यांचे योगदान आहे. या मालिकेपूर्वी सुनील गावसकरांनी दिलेली प्रतिक्रिया चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ग्लंडकडे ‘बॅझबॉल’ असेल तर आमच्याकडे ‘विराटबॉल’ –

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना भारताचे माजी कर्णधार गावसकर यांनी म्हणाले की, इंग्लंडकडे ‘बॅझबॉल’ असेल तर आमच्याकडे ‘विराटबॉल’ आहे. कोहली पुन्हा एकदा शानदार फलंदाजी करेल इंग्लिश गोलंदाजांचा भरपूर समाचार घेईल, असा विश्वास गावसकर यांनी व्यक्त केला आहे.
माजी भारतीय दिग्गज पुढे म्हणाले, “इंग्लंडकडे बॅझबॉल असेल तर आमच्याकडे विराटबॉल आहे. इंग्लंड त्याच रणनीतीने खेळेल पण त्यांनी हे विसरू नये की भारताकडे विराट कोहली आहे, जो त्यांची रणनीती बिघडवू शकतो. त्यामुळे मालिकेतील पहिला कसोटी सामना खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण बॅझबॉलची खरी कसोटी फिरकीपटूंविरुद्ध असणार आहे.”

इंग्लंडसमोर भारताच्या फिरकीपटूंचे तगडे आव्हान –

भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका भारतीय खेळपट्ट्यांवर होणार आहे. भारतीय खेळपट्ट्यांवर बेसबॉल क्रिकेट खेळणे इंग्लंडसाठी इतके सोपे असणार नाही. भारतीय खेळपट्ट्यांवर फिरकीपटूंना भरपूर साथ मिळते. हे पाहता रवींद्र जडेजा, आर अश्विन आणि अक्षर पटेल या महान फिरकीपटूंचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. ज्यामुळे इंग्लंडला खूप त्रास होणार आहे. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेतील शेवटचा कसोटी सामना जिंकला आहे, त्यामुळे टीम इंडियाचे मनोबल उंचावले आहे.

हेही वाचा – Sania-Shoaib Divorce : शोएब मलिकच्या ‘या’ सवयीचा सानियाला व्हायचा त्रास, कुटुंबियांनीच सांगितलं खरं कारण

इंग्लंडविरुद्ध विराट कोहलीची कामगिरी –

विराट कोहलीच्या इंग्लंडविरुद्धच्या कामगिरीबद्दल बोलायचे, तर नेहमीच चांगली फलंदाजी करतो. इंग्लंडविरुद्ध द्विशतक आणि दोन शतके झळकावण्यात कोहलीला यश आले आहे. घरच्या मैदानावर कोहलीविरुद्ध गोलंदाजी करणे हे कोणत्याही गोलंदाजासाठी आव्हान असते. अशा स्थितीत कोहलीविरुद्ध इंग्लंडचे गोलंदाज काय रणनीती मांडतात हे पाहणे रंजक ठरणार आहे. कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत एकूण १९९१ धावा केल्या आहेत. आता पहिल्या कसोटीत ९ धावा करतानच कोहली इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत २००० धावा पूर्ण करेल.