Sunil Gavaskar Slams Indian Batsman: आयसीसी विश्वचषकापूर्वी टीम इंडियाला चौथ्या क्रमांकावर मैदानात उतरवण्यासाठी फलंदाजांची निवड करायची होती. आशिया चषकापासून सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि केएल राहुल या सर्वांनी पुन्हा दाखवून दिले की त्यांच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो तर श्रेयस अय्यरने या भूमिकेत संघासाठी प्रमुख फलंदाज म्हणून आपली स्थिती कायम ठेवली. अय्यरने त्या स्थितीत भारतासाठी २६ सामन्यांमध्ये ४५.९० च्या सरासरीने दोन शतके आणि सहा अर्धशतकांसह ९६४ धावा केल्या आहेत. तर विश्वचषकात सुद्धा पाकिस्तान विरुद्ध नाबाद अर्धशतक झळकावरून अय्यरने आपली पात्रता सिद्ध केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दुसरीकडे भारताचे माजी कर्णधार व फलंदाज सुनील गावसकर यांनी मात्र अय्यरच्या मैदानातील घाईवर टीका करत त्याला मोलाचा सल्ला दिला आहे. गावसकर स्टार स्पोर्ट्सवर म्हणाले की, “श्रेयस अय्यरला चौथ्या क्रमांकावर खेळण्याची मोठी संधी मिळतेय त्याने त्याचं प्रत्येक वेळी सोनंच करायला हवं. अलीकडेच बांगलादेश विरुद्ध सामन्यात अय्यरने २५ चेंडूत १९ धावा केल्या होत्या व त्यानंतर त्याने मिडविकेटवर अक्षरशः समोरूनच स्वतःची विकेट फेकली. त्याने संयम सोडला आणि शुबमन गिलने सुद्धा ५२ धावा केल्यावर पुन्हा तीच चूक केली.”

“IND vs BAN सामन्यात नाबाद शतक झळकावणाऱ्या विराट कोहलीकडून या फलंदाजांनी शिकायला हवं, कोहलीने विश्वचषक स्पर्धेत ८५, नाबाद ५५ , १६ आणि नाबाद १०३ धावांची नोंद केली आहे. “कोहली असं कधीच करत नाही. तो क्वचितच त्याची विकेट स्वस्तात देतो. जेव्हा तो ७०-८० पर्यंत पोहोचला तेव्हा त्याला समजले की त्याला शतक करण्याची संधी आहे तेव्हा तर तो गोलंदाजाला विकेटसाठी कठीण परिश्रम घेण्यास भाग पाडतो आणि असंच करायला हवं कारण दररोज तुम्ही शतकं झळकावण्याच्या स्थितीत असताच असे नाही.”

बांगलादेशविरुद्धचे शतक हे कोहलीचे एकदिवसीय क्रिकेटमधील ४८ वे शतक होते. ज्यानंतर तो आता सचिन तेंडुलकरच्या विलक्षण विक्रमाची बरोबरी करण्यापासून एक टप्पा दूर आहे. गावस्कर म्हणाले की,”कोहली आणि गिलसारख्या खेळाडूंना शतके कशी झळकावायची हे माहित आहे आणि अय्यरने ते शिकले पाहिजे. “शतक कसे गाठायचे हे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे आणि श्रेयस अय्यर आणि शुबमन गिलसाठी ते महत्त्वाचे आहे. शुबमन गिल किमान शतक पूर्ण तरी करतोय पण तर श्रेयस अय्यरला अद्याप ते जमलेले नाही. त्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळत आहे. पोकळ गोलंदाजीसमोरही त्याने लगेचच संधी गमवायला नको. “