IND vs ENG Sunil Gavaskar Statement on Concussion Substitue: भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताने ४-१ ने विजय मिळवला, परंतु या मालिकेतील चौथ्या सामन्यादरम्यान म्हणजेच पुण्यातील टी-२० सामन्यात कनक्शन सबस्टीट्यूटबाबत वाद निर्माण झाला. चौथ्या टी-२० सामन्यादरम्यान शिवम दुबेच्या डोक्याला चेंडू लागला आणि दुसऱ्या डावात त्याच्या जागी कनक्शन सबस्टीट्यूट म्हणून हर्षित राणाला संघात स्थान देण्यात आले. इंग्लिश कर्णधार जोस बटलरनेही या बदलाबाबत नाराजी व्यक्त केली होती आणि आपण या निर्णयाशी सहमत नसल्याचे सांगितले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता टीम इंडियाचे माजी सलामीवीर फलंदाज सुनील गावसकर यांनीही या विषयावर आपले मत मांडले असून पुण्यातील इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात शिवम दुबेच्या जागी भारताने कनक्शन सबस्टीट्यूटचा समावेश करण्यास नको होता, असे त्यांचे मत आहे. गावस्करांनी इंग्लंडच्या माजी फलंदाजांच्या युक्तिवादाशी सहमती दर्शवली आणि सांगितले की, चेंडू डोक्याला लागला तरीही दुबेने शेवटच्या षटकात शेवटपर्यंत फलंदाजी केली आणि या अष्टपैलू खेळाडूच्या डोक्याला दुखापत झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा

गावसकर यांनी टेलिग्राफच्या स्तंभलेखात लिहिले की, “पुण्यात झालेल्या सामन्यात हेल्मेटवर चेंडू आदळल्यानंतरही दुबेने शेवटपर्यंत फलंदाजी केली आणि त्यानंतर त्याला दुखापत झाली नसल्याचे स्पष्ट झाले. त्याने शेवटपर्यंत फलंदाजी केली, त्यामुळे कनक्शन सबस्टीट्यूटसाठी परवानगी देणे योग्य नव्हते. हो, फलंदाजी करताना त्याच्या स्नायूंवर ताण आला असता तर सबस्टीट्यूटचा पर्याय होता, पण तो फक्त क्षेत्ररक्षणासाठी होता आणि तो (हर्षित राणा) गोलंदाजी करू शकला नाही.”

इंग्लंडच्या फलंदाजांची बाजू घेत गावस्कर पुढे म्हणाले, “दुबे आणि राणा बद्दल कोणीही असे म्हणू शकतो की दोघेही समान आहेत. हा त्या दोघांची उंची सारखी आहे असं म्हणता येईल आणि त्यांच्या क्षेत्ररक्षणाचा स्तर सारखात आहे, परंतु याशिवाय, दोघांमध्ये काहीही साम्य नाही. हा भारतीय संघ एक जबरदस्त संघ आहे आणि त्यांनी अशा गोष्टींमुळे त्यांचा विजय डागाळू देऊ नये.”

शिवम दुबेचा कनक्शन सबस्टीट्यूट म्हणून मैदानावर आल्यानंतर हर्षित राणाने लगेच आपल्या कामगिरीची छाप पाडली. हर्षित राणाने येताच क्षेत्ररक्षण करताना जोस बटलरला बिश्नोईच्या गोलंदाजीवर झेलबाद केले. यानंतर त्याने ३ विकेट्स घेत इंग्लंडच्या फलंदाजांना फार काळ मैदानावर टिकू दिले नाही.

इंग्लंडच्या कर्णधाराने सामन्यानंतर बोलताना कनक्शन सबस्टीट्यूटबाबत नाराजी व्यक्त करताना शिवम दुबेच्या गोलंदाजीवर प्रश्न उपस्थित केले होते. पण शिवम दुबेने वानखेडेच्या मैदानावर झालेल्या पाचव्या टी-२० सामन्यात २ विकेट्स घेत आपल्या गोलंदाजीची चमक दाखवून दिली. त्याने तुफान फटकेबाजी करणाऱ्या फिल सॉल्टला माघारी धाडले तर जेकब बेथलला क्लीन बोल्ड करत महत्त्वपूर्ण योगदान दिले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil gavaskar statement on concussion substitute shivam dube harshit rana in ind vs eng t20i bdg