Sunil Gavaskar Statement on Jay Shah’s ICC Chairman: भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी जय शाह आयसीसीचे अध्यक्ष होणार, या चर्चांवर आपल्या स्तंभलेखातून मत मांडले आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी नेमणूक होणार असल्याची चर्चा जोर धरून आहे. जय शाह आंतररष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवे अध्यक्ष म्हणून रूजू होण्या सुनील गावसकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – PAK vs BAN: सामना गमावला, क्रिकेट विश्वात फजिती झाली अन् आता ICCनेही पाकिस्तानला दिला धक्का; चुकीची शिक्षा देत…

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) पुढील अध्यक्ष बनल्याने जागतिक क्रिकेटवर सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास सुनील गावस्कर यांनी व्यक्त केला आहे. गावस्कर यांनी स्पोर्टस्टारमधील त्यांच्या स्तंभात शाह यांनी बार्कले यांना पदावरून पायउतार होण्यास भाग पाडले अशी चर्चा सुरू आहे, गावसकर यांनी या चर्चांवर जबरदस्त उत्तर दिले आहे.

नेतृत्व बदलावर असमाधानी दिसणाऱ्या क्रिकेटच्या तथाकथित “ओल्ड पॉवर्स”वर त्यांनी टीका केली. ते म्हणाले की, हे टीकाकार आंतरराष्ट्रीय क्रिकेटवरील नियंत्रण गमावण्याची चिंता करत आहेत. या ओल्ड पॉवर्ससाठी त्यांनी टॉल पॉपी सिंड्रोम हा शब्द वापरला. या शब्दाचा अर्थ एखाद्या व्यक्तीच्या यशाबद्दल टीका करणे असा होतो.

हेही वाचा – Womens T20 WC 2024: भारत पाकिस्तान सामन्याची तारीख ठरली, ICC ने जाहीर केलं T20 World Cupचे वेळापत्रक

गावसकर यांनी हा शब्द वापरण्यामागचं कारण म्हणजे जय शाह यांच्या यशाचा या “ओल्ड पॉवर्स”ना हेवा वाटतो, कारण त्यांना हे समजले आहे की ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट आपल्याप्रमाणे चालवू शकणार नाहीत. जय शाह आयसीसीचे अध्यक्ष बनल्याने भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट तसेच जगभरातील खेळाडूंना फायदा होणार आहे. ते म्हणाले की जर ओल्ड पॉवर्स वाटत असेल की बार्कलेवर तिसऱ्या टर्मसाठी विचार न करण्याचा दबाव टाकला गेला असेल तर आयसीसीमधील त्यांचे स्वतःचे प्रतिनिधी बैठकीत काय करत होते? त्यांनी आक्षेप का घेतला नाही? जर त्यांना आक्षेप नव्हता तर विनाकारण एखाद्याकडे बोट का दाखवावं? हा टॉल पॉपी सिंड्रोम आहे.

हेही वाचा – VIDEO: सचिन तेंडुलकर आणि ‘बाकरवडी-चहा’, नवी जाहिरात का करतेय प्रेक्षकांना भावुक?

गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेटची ज्या प्रकारे प्रगती झाली आहे, त्यात बीसीसीआय आणि त्याच्या प्रशासनाचेही योगदान आहे. भारतामध्ये या खेळाच्या भरभराटीचे एक प्रमुख कारण पुरुष आणि महिला दोन्ही संघांद्वारे खेळले जाणारे क्रिकेट देखील आहे. जर संघ जिंकत नसेल तर प्रायोजक दूर राहतील. खेळाडू आणि प्रशासक या दोघांचे उत्कृष्ट सांघिक कार्याची यामागे मोठी भूमिका आहे. ज्यामुळेच भारतीय क्रिकेट इतकं चांगल्या स्थितीत आहे आणि सदैव असेच राहो.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil gavaskar statement on jay shah icc president post greg barkley old powers in column bdg