भारत पाकिस्तानचे संघ फक्त आयसीसी स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटमधील हायव्होल्टेज सामना म्हणून भारत-पाकिस्तानकडे पाहिले जाते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या राजनैतिक संबंधांमुळे दोन्ही शेजारी राष्ट्रांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळवली जात नाही. संघ फक्त आशिया कप आणि आयसीसी टूर्नामेंटमध्ये खेळते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका पुन्हा सुरू होणार का? यावर सुनील गावस्करांनी आपले मत मांडले आहे.

स्पोर्ट्स सेंट्रलशी बोलताना सुनील गावस्कर म्हणाले, “जर दोन्ही देशांच्या सीमेवर शांतता असेल. ही खूप साधी गोष्ट आहे जर दोन्ही देशांच्या सीमेवर शांतता असेल. तर दोन्ही देशांचं सरकार म्हणेल ठिके, आता पूर्वीसारखी काही प्रकरणं होत नाहीय, बिलकुलच होताना दिसत नाहीय, तर याबाबत चर्चा करायला हरकत नाही.

तो म्हणाला, “मला खात्री आहे की काही बॅक कनेक्शन चालू असतील. आपण घुसखोरीबद्दल ऐकतो त्यामुळे मैदानात आणि मैदानाबाहेर का घडतंय हेही पाहणं गरजेचं असणार आहे. याच कारणामुळे भारतीय सरकार म्हणत असेल की पाहा हे सगळं थांबत नाहीतर तोपर्यंत याबाबत काही चर्चा करू शकत नाही.

भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट संघ अखेरचे २०१२-१३ मध्ये द्विपक्षीय मालिकेत आमनेसामने आले होते. त्यानंतर पाकिस्तानने एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी भारताचा दौरा केला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सर्वात अलीकडील सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या सामन्यात, भारतीय क्रिकेट संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला आणि या सामन्यात विराट कोहलीने शानदार शतक झळकावले होते.

Story img Loader