भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर यांच्या जग्वार गाडीला मँचेस्टरहून लंडनला जाताना अपघात झाला असला तरी त्यामधून ते सुखरूपपणे बचावले आहेत.
मँचेस्टरचा कसोटी सामना आटोपल्यावर ‘स्काय स्पोर्ट्स’ या कंपनीच्या समालोचकांबरोबर गावस्कर लंडनला जात होते. या वेळी त्यांच्याबरोबर समालोचक मार्क निकोलस आणि मित्र चंद्रेश पटेल होते. पाऊस पडल्याने गावस्कर यांनी चालकाला गाडी संथ चालवण्याबद्दल सांगितले होते. चालकाने गावस्कर यांचे म्हणणे न ऐकल्याने अपघात झाला आणि गाडीला मार बसला; पण गाडीतील कोणत्याही व्यक्तीला दुखापत झालेली नाही. अपघात झाला त्यावेळी गावस्कर वर्तमानपत्र वाचत होते तर अन्य दोघे गाढ झोपेत होते.
‘‘देवानेच आम्हाला वाचवले. मुसळधार पाऊस पडत होता आणि आमची गाडी वेगाने चालली होती; पण या अपघातामध्ये कुणालाही दुखापत झाली नाही,’’ असे गावस्कर यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा