Sunil Gavaskar upset he wasn’t invited for Border-Gavaskar Trophy presentation: १० वर्षांचा दुष्काळ संपवत ऑस्ट्रेलियाने अखेरीस बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाला एलन बॉर्डर यांनी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी प्रदान केले आहे. ३-१ ने जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला ट्रॉफी सुपूर्द करण्यासाठी फक्त एलन बॉर्डरच स्टेजवर उपस्थित होते. एलन बॉर्डर आणि सुनील गावस्कर यांच्या नावावरून या ट्रॉफीचं नाव ठेवण्यात आलं होतं. पण गावस्कर ऑस्ट्रेलियामध्ये सिडनीत उपस्थित होत असतानाही त्यांना स्टेजवर बोलावले नाही आणि ते सीमारेषेजवळ उभे राहून टाळ्या वाजवत होते, याबाबत गावस्करांनी नाराजी व्यक्ती केली आहे. पण गावस्कर स्टेजवर का गेले नाहीत, यामागचं कारण काय आहे जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सुनील गावस्करांनी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या प्रेझेंटेशनबाबत बोलताना म्हणाले, “मला तिथे ट्रॉफीच्या सादरीकरणासाठी स्टेजवर उपस्थित राहण्यासाठी नक्कीच आवडले असते. अखेर ही बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आहे आणि ती ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात आहे. म्हणजे, मी इथे मैदानावर उपस्थित आहे. सादरीकरणाच्या बाबतीत, ऑस्ट्रेलिया जिंकला याने मला काही फरक पडत नाही. ते चांगले क्रिकेट खेळले आणि त्यामुळे ते जिंकले आहेत. ठीक आहे, फक्त मी भारतीय आहे म्हणून मी सादरीकरणामध्ये ट्रॉफी देऊ शकली नाही. माझा मित्र एलन बॉर्डरसह ट्रॉफी सादर करताना मला आनंद झाला असता.”

क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) ची योजना अशी होती की जर ऑस्ट्रेलियाने ट्रॉफी जिंकली तर एलन बॉर्डर ट्रॉफी देतील आणि भारताने ही ट्रॉफी त्यांच्याकडे कायम ठेवली तर सुनील गावस्कर ट्रॉफी देतील. गावसकर स्टेजवर न जाण्यामागे हेच कारण होते. यामुळे ते नाराज आहेत.