आयपीएलच्या सातव्या हंगामासाठी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. आयपीएलसंदर्भातील व्यवस्थापकीय निर्णय घेण्याचे अधिकार गावसकर यांना असणार आहेत.
सट्टेबाजी आणि स्पॉट फिक्सिंगप्रकरणावरून आयपीएल स्पर्धेत सहभागी होण्यावरून कोणत्याही संघाला किंवा खेळाडूला रोखण्याचे आदेश आम्ही देणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. सुनील गावसकर यांचे सध्या बीसीसीआयबरोबर क्रिकेट समालोचनाचा करार आहे. तो रद्द करण्यासाठी गावसकर यांनी आवश्यक पावले टाकावीत. त्याचबरोबर हंगामी अध्यक्षपदाच्या काळात गावसकर यांना बीसीसीआयने मानधन द्यावे, असेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.
आयपीएल सट्टेबाजी आणि स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात जावई गुरुनाथ मयप्पन गुंतल्यामुळे या प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी व्हावी, यासाठी श्रीनिवासन यांनी बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडावे, अशा इशारा मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यानंतर गुरुवारी झालेल्या सुनावणी न्यायालयाने गावसकर यांना हंगामी अध्यक्षपद सांभाळण्याचे निर्देश दिले होते. शुक्रवारी त्यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा