Sunil Gavaskar Statement on Rohit Sharma and Virat Kohli: दुलीप ट्रॉफीसाठी संघांची घोषणा करण्यात आली आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये भारताचे अनेक स्टार खेळाडू खेळताना दिसणार आहेत. भारतीय क्रिकेट संघातील जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा आणि विराट कोहली वगळता जवळपास सर्वच खेळाडू खेळताना दिसतील. याआधी विराट कोहली आणि रोहित शर्मा सारखे खेळाडू देखील दुलीप ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार असल्याचे समोर आले होते, परंतु जेव्हा संघाची घोषणा करण्यात आली तेव्हा हे दोन्ही खेळाडू संघाचा भाग नव्हते. तर बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. पण या प्रकरणावर गावसकर थोडे सं वेगळीच प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Rohit Sharma: “आमचं असंच चालतं…” रोहितचा धवल, नायरसह कॅफेमध्ये हटके सेल्फी, मराठमोळ्या मित्राच्या कॅप्शनने वेधलं लक्ष

कोहली-रोहितशिवाय जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या यांची नावे संघात नव्हती. यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष जय शाह यांनी याबाबत बोलताना सांगितले की, आगामी मोठ्या स्पर्धा पाहता देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांच्यावर कोणतेही दडपण नाही. जय शाह म्हणाले, “त्यांना कोणतीही दुखापत होऊ नये, यासाठी त्याच्यावर देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभागी होण्यासाठी दबाव टाकला जात नाही.” आता या प्रकरणावर सुनील गावस्कर संतापले आहेत.

माजी भारतीय कर्णधार गावसकर यांनी मिड डेमध्ये लिहिलेल्या स्तंभात कोहली आणि रोहित (Rohit Sharma and Virat Kohli) दुलीप ट्रॉफीमध्ये खेळणार नाहीत याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर या दोन्ही दिग्गज खेळाडूंनी दुलीप ट्रॉफी का खेळली पाहिजे होती, याबद्दलही सांगितले आहे.

हेही वाचा – Vinesh Phogat: थकलेल्या विनेश फोगटला गावातील सत्कार समारंभादरम्यान आली चक्कर, VIDEO होतोय व्हायरल

गावस्कर यांनी आपल्या स्तंभलेखात लिहिले आहे. “निवडकर्त्यांनी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला दुलीप ट्रॉफीसाठी संघात निवडले नाही, त्यामुळे ते जेव्हा बांगलादेश कसोटी मालिकेत खेळतील तेव्हा त्यांनी जास्त सामन्यांचा सराव केलेला नसणार,” गावस्कर यांनी मिड-डेसाठी त्यांच्या स्तंभात लिहिले.

“जसप्रीत बुमराह सारख्या खेळाडूच्या पाठीच्या दुखापतीचा मुद्दा लक्षात येतो, त्यामुळे ते काळजीने हाताळावे लागेल हे समजण्यासारखे आहे. पण तरी, फलंदाज काही सामन्यांमध्ये थोडा काळ फलंदाजी करू शकले असते. एकदा खेळाडू कोणत्याही खेळात तिशीपर्यंत पोहोचला की, नियमित स्पर्धांमध्ये खेळणं त्यांना आपला फॉर्म टिकवून ठेवण्यास मदत करतात. जेव्हा दीर्घकाळ विश्रांती घेतली जाते तेव्हा स्नायूंची स्मरणशक्ती काही प्रमाणात कमजोर होते आणि तुम्ही पूर्वीप्रमाणे कामगिरी करू शकत नाही,” असं गावसकर पुढे म्हणाले.

हेही वाचा – Shreyas Iyer: “एक मिनिट थांबाल…”, श्रेयस अय्यर दिसताच पैसे मागू लागली गरीब महिला, कारमध्ये बसला अन्… VIDEO व्हायरल

रोहित शर्मा या वर्षी मार्चमध्ये शेवटची कसोटी खेळला होता तर कोहली जानेवारीत खेळला होता. मात्र, दोघेही पांढऱ्या चेंडूचे क्रिकेट नियमित खेळत आहेत. पुढील महिन्यात बांगलादेश कसोटी मालिकेतून ही जोडी मैदानवर परतणार आहे. अलीकडेच रोहित शर्मा आणि विराट कोहली श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकेत खेळले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil gavaskar worried for virat kohli and rohit sharma for not playing duleep trophy and disagrees with bcci decision bdg