Sunil Gavaskar on Asia Cup 2023: आशिया चषक २०२३ मधील सुपर-४ सामने कोलंबोहून हंबनटोटा येथे न हलवण्याच्या निर्णयामागील खरी कहाणी कोणीतरी शोधून काढावी, असे भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाज सुनील गावसकर यांना वाटते. आशियाई क्रिकेट परिषदेने हवामानाच्या कारणास्तव श्रीलंकेत स्थान बदलण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. यावर गावसकर म्हणाले की, “स्थळ बदलण्याचा निर्णय घेताना खेळाडूंची मानसिक आणि शारीरिक वस्तुस्थिती पाहण्याची गरज आहे.”

पीसीबीने आयोजित केलेला आशिया चषक ‘हायब्रीड मॉडेल’मध्ये खेळवला जात आहे, ज्यामध्ये भारताने पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्यानंतर श्रीलंकेत सर्व सामने खेळले आहेत. संपूर्ण आठवडा कोलंबोमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने, सामने हंबनटोटा येथे हलवण्याची चर्चा होती परंतु, आशियाई क्रिकेट परिषद त्यात बदल करण्यास तयार नाही.

हेही वाचा: IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाबाबत सुनील गावसकरांचे मोठे विधान; म्हणाले, “पाकिस्तानच्या गोलंदाजांविरुद्ध…”

‘स्पोर्ट्स टुडे’शी बोलताना सुनील गावसकर म्हणाले की, “कोणतरी याची सत्यता तपासून घेतली पाहिजे. क्रिकेटच्या दृष्टीकोनातून असे दिसते की, कदाचित हे खेळाडूच होते ज्यांना हंबनटोटाला जायचे नव्हते. त्यामुळे कोलंबोतील हवामान खूपच खराब असू शकते हे जाणून प्रशासकांना शेवटच्या क्षणी हंबनटोटातून कोलंबोला जावे लागले.” माजी भारतीय कर्णधाराने स्पष्ट केले की, “मी कोणत्याही विशिष्ट देशाच्या खेळाडूंकडे बोट दाखवत नाही.” त्यांनी स्पष्ट केले, “जेव्हा मी खेळाडू म्हणतो, तेव्हा माझा अर्थ कोणत्याही एका संघाचा खेळाडू असा नाही, सर्व संघांचे खेळाडू ज्यांना तिथे खेळायचे होते किंवा नव्हते.”

सुनील गावसकर पुढे म्हणाले, “खेळाडूंची मानसिक स्थिती चांगली असावी अशी तुमची इच्छा आहे. व्यायामशाळा, सरावाच्या सुविधा चांगल्या असाव्यात अशी सर्व संघांची मानसिकता असते. पण कधी कधी अशा परिस्थितीत आपण महत्त्वाची गोष्ट समजून घेतली पाहिजे की ती म्हणजे हंबनटोटामध्ये पावसाची शक्यता फारच कमी होती आणि कोलंबोमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे.” पुढे ते म्हणाले, “जर मी म्हणालो माझी तयारी आहे तर इतरांची देखील याला मान्यता द्यायला हवी. आशिया कप ही कमी महत्त्वाची स्पर्धा आहे असे मी म्हणत नाही, शेवटी आम्हाला ही स्पर्धा जिंकायची आहे. मात्र, त्यातील येणाऱ्या अडचणी देखील समजून घेणे गरजेचे आहे.”

हेही वाचा: Rahul Dravid: “त्यांना कोणत्याही प्रकारचा गैरसमज…”, हिटमॅन रोहितने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडबाबत केले सूचक वक्तव्य

भारताने नेपाळला त्यांच्या दुसऱ्या गट सामन्यात दहा गडी राखून पराभूत करून आशिया चषक २०२३च्या सुपर-४ टप्प्यासाठी पात्र ठरले. मेन इन ब्लू त्यांचा पहिला सुपर-४ सामना रविवार, १० सप्टेंबर रोजी आर.जे. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना होईल. उभय संघांमधील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.

Story img Loader