कोलकाता नाइट रायडर्स संघाचा फिरकीपटू सुनील नरिनच्या वडिलांचे निधन झाले. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजच्या संघाचा
भाग नसलेला नरिन काही दिवसांपूर्वीच भारतात दाखल झाला. मात्र वडिलांचे निधन झाल्याने तो मायदेशी परतला असल्याचे नाइट रायडर्स संघाचे
मुख्य प्रशिक्षक जॅक कॅलिस यांनी सांगितले.
मायदेशी रवाना झाल्यामुळे नाइट रायडर्सच्या दिल्ली डेअर डेव्हिल्सविरुद्धच्या रविवारी होणाऱ्या लढतीला मुकण्याची शक्यता आहे. गोलंदाजीच्या शैलीत आवश्यक बदल करण्यासाठी नरिनने ट्वेन्टी-२० विश्वचषकातून माघार घेतली होती.

Story img Loader