St Kitts and Nevis Patriots vs Trinbago Knight Riders: कोलकाता नाइट रायडर्स फ्रँचायझी त्रिनबागो नाइट रायडर्सचा फिरकीपटू सुनील नरेन रविवारी कॅरिबियन प्रीमियर लीग २०२३ (सीपीएल 2023) सामन्यादरम्यान रेड कार्ड मिळवणारा पहिला क्रिकेटर बनला. सीपीएलच्या संयोजकांनी स्लो ओव्हर रेटला सामोरे जाण्यासाठी लाल कार्डे आणली आहेत, हे सुनिश्चित करण्यासाठी की संघांनी त्यांच्या षटकांचा कोटा निर्धारित ८५ मिनिटांत पूर्ण केला पाहिजे. त्याचबरोबर कोणत्याही डावात शेवटच्या षटकाच्या सुरुवातीला निर्धारित वेळेपेक्षा मागे पडू नये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सीपीएलमधील स्लो ओव्हर रेटच्या नवीन नियमानुसार, जर एखाद्या संघाला निर्धारित वेळेत षटक पूर्ण करता आले नाही, तर विरोधी संघाचा कर्णधार एक खेळाडू निवडतो, जो उर्वरित षटकांसाठी मैदानाबाहेर राहतो. याशिवाय सर्कलमध्ये ६ क्षेत्ररक्षक आहेत. सुनील नरेन बाहेर पडल्यानंतर त्रिनबागो नाइट रायडर्सकडे फक्त १० खेळाडू उरले होते. मात्र, तरीही संघाने हा सामना ६ गडी राखून जिंकला. शेवटच्या षटकात मैदानाबाहेर जाण्यापूर्वी सुनील नरेनने चार षटकांचा कोटा पूर्ण केला होता.

किरॉन पोलार्डने नाराजी व्यक्त केली –

त्रिनबागो नाइट रायडर्सचा कर्णधार किरॉन पोलार्डने पेनल्टीवर नाराजी व्यक्त केली आहे. तो म्हणाला, “खर सांगायचे तर, यामुळे आमच्या सर्व मेहनतीचा नाश करेल. आम्ही प्याद्यासारखे आहोत आणि आम्हाला जे सांगितले जाईल ते आम्ही करू. आम्ही शक्य तितक्या वेगाने खेळू. जर तुम्हाला अशा स्पर्धेत ३०-४५ सेकंदांसाठी दंड आकारला गेला तर ते पूर्णपणे हास्यास्पद आहे.

हेही वाचा – Neeraj Chopra: जगज्जेत्या ‘गोल्डन बॉय’ला देशाने केला सलाम, पंतप्रधान मोदींसह इतर मान्यवरांनीही केले अभिनंदन

स्लो ओव्हर रेटचा काय आहे नियम?

स्पर्धेतील स्लो ओव्हर रेटबाबतचा नियम काहीसा असा आहे. १८ व्या षटकाच्या सुरुवातीला संघ मागे असल्यास, एकूण ५ खेळाडू वर्तुळात असतील. १९व्या षटकात मागे राहिल्यास ६ क्षेत्ररक्षक वर्तुळात ठेवावे लागतील. २० व्या षटकाच्या सुरूवातीस अजूनही मागे राहिल्यास, एका खेळाडूला मैदानाबाहेर जावे लागेल आणि ६ खेळाडू वर्तुळात राहतील. फलंदाजी करणाऱ्या संघासाठी काही नियम नाहीत असे नाही. पंचांच्या पहिल्या आणि अंतिम इशाऱ्यांनंतर, फलंदाजी करणाऱ्या संघाला वेळ वाया घालवल्याबद्दल ५ धावांचा दंड आकारला जाईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil narine became the first cricketer in the world to receive a red card in cpl 2023 vbm
Show comments