वेस्ट इंडिजचा ऑफस्पिनर सुनील नरेन याच्यावर गोलंदाजीच्या सदोष शैलीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बडतर्फीची कारवाई केली आहे. श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या एकदिवसीय सामन्याचे वेळी नरेन याची शैली सदोष असल्याचे पंचांनी आयसीसीला कळविले होते. त्याच्या शैलीची अतिशय बारकाईने पाहणी करण्यात आली. आयसीसीच्या नियमावलीनुसार त्याची शैली सदोष असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रातून तत्परतेने बडतर्फ करण्यात आले आहे. याबाबत आयसीसीने सर्व देशांच्या क्रिकेट संघटनांना कळविले आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या स्थानिक सामन्यांमध्ये त्याला भाग घेता येईल, मात्र कोणताही आंतरराष्ट्रीय सामना तो खेळू शकणार नाही. तसेच बंदीविरुद्ध अपील करण्याची त्याला संधी मिळणार आहे.
गोलंदाजीच्या सदोष शैलीमुळे नरेनवर बंदी
सुनील नरेनला आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रातून तत्परतेने बडतर्फ करण्यात आले आहे.
First published on: 30-11-2015 at 02:16 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil narine suspended from international cricket for illegal bowling action