क्रिकेटर लोकेश राहुल सध्या श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. मालिकेनंतर तो त्याची गर्लफ्रेंड अथिया शेट्टीसोबत लग्नगाठ बांधणार आहे. अथियाचे वडील आणि बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे की, अथिया आणि राहुल यांना त्यांचे लग्न साधेपणाने व्हावे, अशी इच्छा आहे. त्यामुळे आम्ही देखील तसेच करू.
क्रिकेटर केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अथिया अनेक क्रिकेट दौऱ्यांवर राहुलसोबतही दिसली आहे, ती आयपीएल ते आंतरराष्ट्रीय सामन्यांपर्यंत सर्व गोष्टींमध्ये राहुलला आणि संघाला पाठिंबा देण्यासाठी गेली आहे. दोघेही आता एकमेकांना लाईफ पार्टनर बनवणार आहेत.
दोघेही जानेवारीतच लग्न करणार आहेत, त्याची पुष्टी तारीखेचा खुलासा केला नसला तरी, २१ ते २३ तारखेच्या दरम्यान असेल असा अंदाज वर्तवला जात आहे. एका ताज्या मुलाखतीत सुनील शेट्टीने लग्नाबद्दल खुलासा करताना सांगितले की, हे लग्न अगदी साध्या पद्धतीने होईल. कारण अथिया आणि केएल राहुलची तशी इच्छा आहे.
हेही वाचा – Jay Shah Tweet: पृथ्वी शॉचे कौतुक करणे जय शाहांना पडले चांगलेच महागात; आता होत आहेत ट्रोल, जाणून घ्या कारण
बॉलीवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत सुनील शेट्टीला लग्नाबद्दल विचारले असता, तो म्हणाला, ”ती आमची मुलगी आहे, तिने लग्न करावे, सेटल व्हावे अशी आमची इच्छा आहे. त्यांनाही मुलं व्हावीत, चांगले कौटुंबिक जीवन मिळावे अशी माझी इच्छा आहे. हे सर्व होईल. पण मला वाटतं, एखादी व्यक्ती देशासाठी खेळत आहे, माझी मुलगी तिचं काम करत आहे. त्यामुळे जेव्हा होईल तेव्हा होईल.”
जोडप्याला साध्या पद्धतीने करायचे लग्न –
सुनील शेट्टी पुढे म्हणाला, ”त्या जोडप्याला त्यांचे एका छोट्या पद्धतीने करायचे आहे. जे खूपच साधारण आहे आणि ज्यामध्ये फक्त कुटुंबातील सदस्य असावेत. ही त्यांची दृष्टी आहे आणि पालक म्हणून आम्ही त्याच्या आनंदासाठी सर्वकाही करू.”
केएल राहुलने लग्नासाठी सुट्टी घेतली –
केएल राहुल आज खेळल्या जात असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत भारतीय संघाचा भाग आहे. तसेच तो लवकर लग्न करणार असल्याने आगामी मालिकेतून सुट्टी घेतली आहे. त्याच्या लग्नाच्या फंक्शनमध्ये प्री-वेडिंग फंक्शन्सपासून हळदी, मेहंदी आणि संगीतापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या विधींचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही कुटुंबीयांकडून लग्नाची सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.