महागणपतीच्या साक्षीने टिटवाळ्यात झालेल्या महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत सुनीत जाधवने सलग सहाव्यांदा विजेतेपद पटकावले. सागर माळी आणि अनिल बिलावाचे कडवे आव्हान परतावत त्याने महाराष्ट्र श्री जिंकण्याचा पराक्रम केला. एवढेच नव्हे तर अन्य तिन्ही कॅटेगरीत मुंबईने विजय संपादन कपत चौकार ठोकला आणि सांघिक विजेतेपदावरही आपलेच शिक्कामोर्तब केले. क्रीडाप्रेमी नगरसेवक संतोष तरे यांच्या सहकार्याने महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटना आणि ठाणे जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पडला. यात ‘मिस मुंबई’ मंजिरी भावसारने आपल्या पीळदार शरीरसौष्ठवाचा नजारा सादर करीत फिजीक स्पोर्टस् प्रकारात ‘मिस महाराष्ट्र’चे जेतेपद पटकावले. तर मुंबईच्या अमला ब्रम्हचारीने महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करत ‘मिस महाराष्ट्र’चा मान मिळविला. पुरूषांच्या फिजीक स्पोर्टस् प्रकारात मुंबईचाच रोहन कदम सरस ठरला.

सुनीतने पराभवाचा घेतला बदला

Raju Parve resigned from Umred constituency and joined Bharatiya Janata Party
माजी आमदार राजू पारवेंचे पक्षबदल, लोकसभेत शिवसेनेत, विधानसभेत भाजपमध्ये!
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
Chandrapur district six constituencies, Chimur,
चंद्रपूर जिल्ह्यातील सहा मतदारसंघांत केवळ आठ महिला उमेदवार; चिमूर, ब्रम्हपुरीत एकही महिला रिंगणात नाही
belapur rebel in congress
बेलापूरमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीत बंड; अनिल कौशिक, राजू शिंदे यांचा भाजप प्रवेश
In Bhosari assembly former corporator Ravi Landge supported NCP candidate Ajit Gavane
भोसरी विधानसभा: बंडखोर रवी लांडगे आणि अजित गव्हाणे यांचं मनोमिलन भोसरीतील बंडखोरी शमली, रवी लांडगे उद्या उमेदवारी अर्ज माघारी घेणार
woman candidates
उमेदवारी देताना ‘लाडकी बहीण’ नावडती
ajit pawar allegations on rr patil
आपटीबार: दादा, आभार माना!
Deepak Kesarkar, Rajan Teli , Sawantwadi Assembly
सावंतवाडी विधानसभेचे प्रतिस्पर्धी दिपक केसरकर व राजन तेली श्री देव विठ्ठल मंदिरमध्ये एकत्र

गेल्याच आठवड्यात नवी मुंबईतील एनएमएसए श्री स्पर्धेत ठाण्याच्या सागर माळीने सुनीत जाधवचा पराभव करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्याचा वचपा सुनीतने या स्पर्धेत काढला. ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’च्या लढतीत सुनीत, सागर, अनिल बिलावा आणि महेंद्र पगडे यांच्यात कंपेरिझन घेण्यात आली आणि सुनीतच्या षटकारावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

मुंबईकर अमला, मंजिरी मिस महाराष्ट्र

पूर्ण स्पर्धेवर मुंबईच्या खेळाडूंनी आपला दबदबा दाखवून दिला. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत राज्यभरातून आठ स्पर्धकांचा सहभाग उत्साह उंचावणारा होता. मुंबईच्या अमला ब्रम्हचारीने आपल्या पहिल्याच प्रयत्नात मिस महाराष्ट्र होण्याचा मान मिळविला. गेल्या महिन्यात तिने आपली पहिलीच स्पर्धा खेळताना चंदिगड येथे झालेल्या फेडरेशन कपमध्ये सुवर्ण जिंकून पराक्रम गाजवला होता. महिलांच्या फिजीक स्पोर्टस् प्रकारात डॉ. मंजिरी भावसारने मुंबईच्या दिपाली ओगळेची कडवी झुंज मोडीत काढत विजयाची मालिका कायम ठेवली.

महाराष्ट्र श्री 2019 चे निकाल –

महाराष्ट्र श्री 2019 – सुनीत जाधव (मुंबई)

उपविजेता- सागर माळी (ठाणे)

प्रगतीकारक खेळाडू – अनिल बिलावा ( मुंबई)

सांघिक विजेतेपद – मुंबई (97 गुण)

उपविजेतेपद – मुंबई उपनगर (66), तृतीय क्रमांक – ठाणे (61)

55 किलो वजनीगट – 1. राजेश तारवे (मुंबई), 2. नितीन शिगवण (मुंबई उपनगर), 3. कुतुब बानी (कोल्हापूर), 4. जितेंद्र पाटील (मुंबई उपनगर), 5. अवदुत निगडे (कोल्हापूर), 6. रमेश जाधव (ठाणे).

60 किलो – 1. नितीन म्हात्रे (पश्चिम ठाणे), 2. संदेश सकपाळ ( मुंबई उपनगर), 3.osJe®ebo गावडे ( मुंबई उपनगर), 4. अविनाश वने ( मुंबई), 5. बाळ काटे ( पुणे), 6. रोशन तटकरे (पश्चिम ठाणे)

65 किलो – 1. दिनेश कांबळे (ठाणे). 2. उमेश गुप्ता (मुंबई उपनगर), 3. अरूण पाटील (मुंबई), 4. जगदिश कदम ( मुंबई उपनगर), 5. बप्पन दास (नवी मुंबई), 6. विनायक लोखंडे (पालघर),

70 किलो – संदीप कवडे (मुंबई), 1. मनोज माने (मुंबई उपनगर), 2. तौसिफ मोमिन (पुणे), 3. संतोष शुक्ला (ठाणे), 4. सुरज सुर्यवंशी (पुणे), 5. मनीष ससाणे (पुणे), 6. रोशन नाईक (पश्चिम ठाणे),

75 किलो – 1. भास्कर कांबळी (मुंबई),2. राजु बगाळे (पुणे), 3. अमोल गायकवाड (मुंबई), 4. रोहन गुरव (नवी मुंबई), 5. महेश जाधव (पुणे), 6. मोहम्मद हुसेन (मुंबई),

80 किलो – 1. अनिल बिलावा (मुंबई), 2. सुशांत रांजणकर (मुंबई), 3. हरेश नाईक (ठाणे), 4. अभिषेक खेडेकर (मुंबई), 5. अब्दुल अन्सारी (पुणे), 6. लंगरकर (कोल्हापूर).

85 किलो – 1. सुशील मुरकर (मुंबई), 2. अजय नायर ( ठाणे),3. सकिंद्र सिंग (मुंबई उपनगर), 4. मलल्sश धनगर (पुणे), 5. सुजन पिळणकर (मुंबई), 6. सचिन डोंगरे (मुंबई).

90 किलो – 1. सुनीत जाधव (मुंबई), 2. दिपक तांबिटकर (मुंबई), 3. देवेंद्र भोईर (पश्चिम ठाणे), 4. कृष्णा कदम (पुणे), 5. योगेश सिलीवेरू (ठाणे), 6. उबेद पटेल (मुंबई),

100 किलो – 1. सागर मळी (ठाणे), 2. महेंद्र चव्हाण (पुणे), 3. ललल्न मिश्रा (ठाणे), 4. गणेश शेंडगे (पुणे), 5. जयेश ढोले ( ठाणे).

100 किलोवरील – 1. महेंद्र पगडे (ठाणे), 2. निलेश दगडे (मुंबई उपनगर), 3. रविकांत पाष्टे (मुंबई), 4. जुबेर शेख (पुणे)

पुरूष फिजीक स्पोर्टस् – 1. रोहन कदम (मुंबई), 2. संजय मकवाना (ठाणे), 3. शुभम कांदू (मुंबई उपनगर), 4. स्वराज सिंग (मुंबई उपनगर), 5. विजय हाप्पे ( मुंबई उपनगर), 6. आतिक खान (मुंबई).

महिला फिजीक स्पोर्टस् – 1. मंजिरी भावसार (मुंबई), 2. दिपाली ओगळे ( ठाणे), 2. रेणूका मुदलीयार (मुंबई उपनगर), 3. स्टेला गोडे (पुणे), 4. निशरीन पारीख (मुंबई), रीठा तारी (मुंबई उपनगर).

महिला शरीरसौष्ठव स्पर्धा – 1. अमला ब्रम्हचारी ( मुंबई), 2. फातिमा (पुणे), 3. श्रद्धा डोके ( मुंबई उपनगर), 4. मयुरी पोटे (ठाणे, 5. अंजली पिलल्s (ठाणे), 6. शिंदे (ठाणे)