महागणपतीच्या साक्षीने टिटवाळ्यात झालेल्या महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत सुनीत जाधवने सलग सहाव्यांदा विजेतेपद पटकावले. सागर माळी आणि अनिल बिलावाचे कडवे आव्हान परतावत त्याने महाराष्ट्र श्री जिंकण्याचा पराक्रम केला. एवढेच नव्हे तर अन्य तिन्ही कॅटेगरीत मुंबईने विजय संपादन कपत चौकार ठोकला आणि सांघिक विजेतेपदावरही आपलेच शिक्कामोर्तब केले. क्रीडाप्रेमी नगरसेवक संतोष तरे यांच्या सहकार्याने महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटना आणि ठाणे जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पडला. यात ‘मिस मुंबई’ मंजिरी भावसारने आपल्या पीळदार शरीरसौष्ठवाचा नजारा सादर करीत फिजीक स्पोर्टस् प्रकारात ‘मिस महाराष्ट्र’चे जेतेपद पटकावले. तर मुंबईच्या अमला ब्रम्हचारीने महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करत ‘मिस महाराष्ट्र’चा मान मिळविला. पुरूषांच्या फिजीक स्पोर्टस् प्रकारात मुंबईचाच रोहन कदम सरस ठरला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा