किंग्ज ईलेव्हन पंजाबचे आव्हान संपुष्टात; वॉर्नर, युवराजची फटकेबाजी

डेव्हिड वॉर्नरच्या शानदार शतकाने रचलेल्या पायावर युवराज सिंगच्या धुवाँदार फटकेबाजीने कळस चढवला. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादने किंग्ज ईलेव्हन पंजाबचा सात विकेट्स आणि २ चेंडू राखून पराभव केला. हैदराबादने १२ सामन्यांत १६ गुणांची कमाई करीत आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेच्या बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे, तर पंजाबचे आव्हान संपुष्टात आले आहे.

पंजाबने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद १७९ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. यात सलामीवीर हशिम अमलाच्या फलंदाजीचा सिंहाचा वाटा होता. त्याने ५६ चेंडूंत १४ चौकार आणि २ षटकारांसह ९६ धावा केल्या.

त्यानंतर हैदराबादच्या डावात वॉर्नर (५२) आणि शिखर धवन (२५) यांनी ६८ धावांची सलामी नोंदवली. मग दीपक हुडा (३४), युवराज आणि बेन कटिंग (२१) यांनी वेगाने फटकेबाजी करीत संघाला जिंकून दिले. युवीने २४ चेंडूंत ३ चौकार आणि ३ षटकारांनिशी नाबाद ४२ धावा केल्या. अखेरच्या षटकात हैदराबादला विजयासाठी ९ धावा हव्या होत्या. मोहित शर्माने पहिलाच चेंडू वाइट टाकला, मग पुढच्याच चेंडूवर युवराजने डीप मिडविकेटला षटकार खेचून पंजाबच्या आव्हानातील हवाच काढली. मोहितने दुसरा चेंडू निर्धाव टाकला, तर तिसऱ्या चेंडूवर युवीने एक धाव काढली. मग चौथ्या चेंडूवर कटिंगने चौकार मारून हैदराबादच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

संक्षिप्त धावफलक

किंग्ज ईलेव्हन पंजाब : २० षटकांत १७९ (हशिम अमला ९६; भुवनेश्वर कुमार २/३२) पराभूत वि. सनरायझर्स हैदराबाद (डेव्हिड वॉर्नर ५२, युवराज सिंग नाबाद ४२, दीपक हुडा ३४; अक्षर पटेल १/२६)

Story img Loader