अटीतटीच्या लढतीत हैदराबादचा ४ धावांनी विजय
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अॅडम झम्पाच्या अप्रतिम गोलंदाजीनंतर फलंदाजांनी केलल्या निराशाजनक कामगिरीमुळे रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाला अटीतटीच्या लढतीत ४ धावांनी पराभव पत्करावा लागला. हैदराबादच्या १३७ धावांचा पाठलाग करताना पुण्याला ८ बाद १३३ धावांपर्यंतच मजल मारता आली. या पराभवामुळे इंडियन प्रीमिअर लीगमधील पुण्याचे आव्हान जवळपास संपुष्टात आल्यात जमा आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या हैदराबादच्या फलंदाजांवर पुण्याच्या गोलंदाजांनी चांगलाच चाप बसवला. ऑस्ट्रेलियाच्या अॅडम झम्पाने चार षटकांत १९ धावा देत सहा बळी टिपून हैदराबादची धावगती रोखली. कर्णधार डेव्हिड वॉर्नर (११) चौथ्या षटकात आर. पी. सिंगच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्यानंतर शिखर धवन आणि केन विल्यमसन यांनी खेळपट्टीवर ठाण मांडला, परंतु त्यांच्या धावांना वेग नव्हता. अश्विनच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात धवन बाद झाला. विल्यमसनला युवराज सिंगनेही छोटेखानी साथ दिली. सुरुवातीला चाचपडणाऱ्या युवराजने दोन खणखणीत षटकार खेचून सामन्यात रंगत आणली. झम्पाने एकामागून एक फलंदाजाला बाद करत हैदराबादला ८ बाद १३७ धावांवरच समाधान मानण्यास भाग पाडले.
प्रत्युत्तरात पुण्याचेही सलामीवीर झटपट बाद झाले. अजिंक्य रहाणे व उस्मान ख्वाजा हे दोघेही धावफलकावर १९ धावा असताना माघारी परतले होते. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने जॉर्ज बेली आणि आर. अश्विन यांना फलंदाजीत बढती दिली. या दोघांनी ती सार्थ ठरवताना संयमी खेळ करून संघाचा धावफलक हलता ठेवला. हैदराबादच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा त्यांना फायदा झाला. या दोघांची तिसऱ्या विकेटसाठीची ४९ धावांची भागीदारी मोइसेस हेन्रिक्सने संपुष्टात आणली. त्याने बेलीला (३४) बाद केले. अश्विनही २९ धावांवर बरिंदर सरणच्या गोलंदाजीवर बाद झाला. सौरभ तिवारी स्वस्तात बाद झाल्याने पुण्यासमोरील अडचणी वाढल्या. मात्र धोनी आणि थिसारा परेराने फटकेबाजी करून पुण्याचा विजयाच्या उंबरठय़ावर आणले. अखेरच्या षटकात विजयासाठी १४ धावांची गरज असताना पहिल्या तीन चेंडूंत आशिष नेहराने दोन धावा देत परेराला बाद केले. त्यानंतर ३ धावांत १२ धावा हव्या असताना धोनीने षटकार खेचून सामन्यात रंगत आणली, परंतु त्याला विजयात रुपांतर करण्यात अपयश आले.
संक्षिप्त धावफलक
सनरायझर्स हैदराबाद : ८ बाद १३७ (शिखर धवन ३३, केन विल्यमसन ३२, युवराज सिंग २३; अॅडम झम्पा ६/१९) विजयी वि. रायझिंग पुणे सुपरजायंट्स : ८ बाद १३३ धावा (जॉर्ज बेली ३४, आर. अश्विन २९, महेंद्रसिंग धोनी ३०; आशिष नेहरा ३/२९).
सामनावीर : अॅडम झम्पा