IPL 2025 Sunrisers Hyderabad bowling coach Dale Steyn post : आयपीएलचा १८वा हंगाम २०२५ मध्ये खेळला जाणार आहे. या आगामी हंगामासाठी सर्व फ्रँचायझी त्यांच्या खेळाडूंबाबत रणनीती आखत असताना, काही संघांनी त्यांच्या कोचिंग स्टाफमध्ये बदलही केले आहेत दरम्यान, आयपीएल २०२५ पूर्वी सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का बसला आहे. या संघासाठी वेगवान गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका बजावणाऱ्या डेल स्टेनने एक मोठा निर्णय घेत संघातून बाहेर पडण्याची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. डेल स्टेनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या एका पोस्टद्वारे ही माहिती दिली, ज्यामध्ये त्याने स्पष्टपणे लिहिले की तो आयपीएल २०२५ साठी येणार नाही.

सनरायझर्स हैदराबादचे मानले आभार –

सनरायझर्स हैदराबाद संघाने डेल स्टेनची डिसेंबर २०२१ मध्ये वेगवान गोलंदाज प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर त्याने सलग तीन हंगाम ही जबाबदारी सांभाळली आहे. गेल्या आयपीएल हंगामात, डेल स्टेनने हैदराबाद संघाचा नवा कर्णधार पॅट कमिन्ससोबत काम केले, ज्यामध्ये संघ अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी ठरला होता.

Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
Devendra fadnavis mim
‘एमआयएम’वर उद्धव ठाकरेंपेक्षा देवेंद्र फडणवीस यांची अधिक प्रखर टीका
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू नेते, एकनाथ शिंदे दिलदार माणूस-राज ठाकरे
Vishwajeet Kadam jayshri patil
Vishwajeet Kadam: जयश्री पाटील यांना बंडखोरीस भाग पाडले – विश्वजित कदम
Sharad Pawar claims that the grand alliance plans are possible but people want change print politics news
महायुतीच्या योजनांचा परिणाम शक्य पण लोकांना बदल हवाच! शरद पवार यांचा दावा
Constituent parties Shiv Sena and NCP in Mahayuti in Vasai are upset
वसईतील महायुतीमध्ये धुसफूस; शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष नाराज
Most rebellion in Konkan in bjp
कोकणात सर्वाधिक बंडखोरी भाजपमध्ये

डेल स्टेनने एक्सवर पोस्ट करताना लिहिले, ‘मला आयपीएलमध्ये गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारण्याची संधी दिल्याबद्दल मी सनरायझर्स हैदराबाद संघाचे खूप आभार मानू इच्छितो. पण मी आयपीएल २०२५ साठी परत येणार नाही. कारण, मी दक्षिण आफ्रिकेतील एसए टी-२० मध्ये सनरायझर्स इस्टर्न केपसोबत काम करणे सुरु ठेवणार आहे. एसए टी-२० मध्ये दोनदा जेतेपद जिंकणाऱ्या सनरायझर्स इस्टर्न केप सलग तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकवण्याचा प्रयत्न करणार आहे.’

हेही वाचा – IND vs NZ : भारताने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय, प्लेइंग इलेव्हनमध्ये केले दोन मोठे बदल, शुबमनच्या जागी द्विशतकवीरला दिली संधी

सनरायझर्स हैदराबादने २०२४ च्या हंगामापूर्वी कोचिंग स्टाफमध्ये केला होता बदल –

सनरायझर्स हैदराबाद संघाने २०२४ मध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल हंगामापूर्वी आपल्या कोचिंग स्टाफमध्ये अनेक मोठे बदल केले होते, ज्यामध्ये डॅनियल व्हिटोरीला नवीन मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले होते. त्याचबरोबर डेल स्टेनला गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कायम ठेवले होते. आता या पदावर सनरायझर्स हैदराबाद संघ कोणाची नियुक्ती करतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.