आयपीएलच्या १६ व्या हंगामातील ३४ वा सामना सनरायझर्स हैद्राबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात हैद्राबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये होत आहे. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दिल्लीने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ८ विकेट्स गमावत १४४ धावा केल्या होत्या. परंतु, १४५ धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैद्राबादची दमछाक झाली. अटीतटीच्या सामन्यात दिल्लीने हैद्राबादचा पराभव केला. हैद्राबादने २० षटकात ६ विकेट्स गमावत १३७ धावा केल्या. दिल्लीच्या गोलंदाजांनी हैद्राबादवर दणदणीत विजय मिळवला.

सनरायझर्स हैद्राबादच्या गोलंदाजांनी भेदक मारा करून दिल्ली कॅपिल्सच्या फलंदाजांना माघारी पाठवलं. नॉर्खियाने हॅरी ब्रुकला ७ धावांवर असताना क्लीन बोल्ड केलं. त्यानंतर मयंक अग्रवालने सावध खेळी करत सनरायझर्सचा डाव सावरला. मयंकने ३९ चेंडूत ४९ धावांची खेळी साकारली. मात्र, अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर मयंक झेलबाद झाला आणि सनरायझर्सला मोठा धक्का बसला. त्यानंतर इशांत शर्माने राहुल त्रिपाठीला १५ धावांवर झेलबाद केलं. कुलदीप यादवच्या फिरकीवर अभिषेक शर्मा ५ धावांवर बाद झाला. तर कर्णधार एडन मार्करम अवघ्या तीन धावांवर असताना अक्षर पटेलने त्रिफळा उडवला. त्यानंतर सनरायझर्सला हेन्री क्लासेनने चौफेर फटकेबाजी करून विजयाच्या दिशेनं नेलं होतं. मात्र, नॉर्खियाच्या गोलंदाजीवर क्लासेन १९ चेंडूत ३१ धावा करून बाद झाला.

West Indies Beat England with New Record of Highest Successful Chase in in T20I At Home Soil of 219 Runs WI vs ENG
ENG vs WI: वेस्ट इंडिजचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय! संथ सुरूवातीनंतर षटकारांचा पाऊस, कॅरेबियन संघाने मोडला ७ वर्षे जुना विक्रम
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Sanju Samson Tilak Varma Smash World Record in Johannesburg with Fiery Centuries in T20I IND vs SA
IND vs SA: तिलक वर्मा-संजू सॅमसनचे ‘वर्ल्ड रेकॉर्ड’, जोहान्सबर्गमध्ये लावली विक्रमांची चळत; वाचा १० अनोखे विक्रम
India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
India vs South Africa 4th T20 Live Updates in Marathi
IND vs SA: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विक्रमी १३५ धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली
Indian Cricket Team Creates History Becomes First Team To Score 5 T20I International Century in 2024 IND vs SA Tilak Varma
IND vs SA: तिलक वर्माच्या शतकासह भारतीय संघाने घडवला इतिहास, टी-२० क्रिकेटमध्ये २०२४ मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला संघ
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी

त्यानंतर मिचेल मार्शने सावध खेळी करत २५ धावा साकारल्या. पण मार्शही नटराजनच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि दिल्लीला दुसरा धक्का बसला. त्यानंतर कर्णधार डेविड वार्नर, सर्फराज खान आणि अमन खान वॉशिंग्टन सुंदरने बाद केलं अन् दिल्लीची फलंदाजी गडगडली. पण अक्षर पटेल आणि मनिष पांडेच्या जबरदस्त भागिदारीमुळं दिल्लीने २० षटकात ९ विकेट्स गमावत १४४ धावा केल्या होत्या. त्यामुळे सनरायझर्सला २० षटकात विजयासाठी १४५ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार होतं. सनरायझर्स हैद्राबादकचा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने एकाच षटकात तीन फलंदाजांना बाद करून दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का दिला.

सुंदरने डेविड वार्नरला २१ धावांवर असताना बाद केलं. त्यानंतर लगेच सर्फराज खान सुंदरच्या गोलंदाजीचा शिकार झाला. सर्फराझ ९ धावा करून तंबुत परतला. त्यानंतर अमन खानलाही ४ धावांवर बाद करण्यात सुंदरला यश आलं. एकाच षटकात तीन फलंदाज बाद झाल्याने दिल्लीची धावसंख्या मंदावली. अक्षर पटेलने ३४ चेंडूत ३४ धावा तर मनिष पांडेने २७ चेंडूत ३४ धावांची खेळी साकारली.