फटक्यांच्या आतषबाजींच्या शर्यतीत किंग्ज इलेव्हन पंजाबने सनरायझर्स हैदराबादवर सहा विकेट व आठ चेंडू शिल्लक असताना सरशी मिळवली. या विजयासह त्यांनी आघाडीस्थानावर पुन्हा झेप घेतली आहे.
प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २० षटकांत ५ बाद २०५ धावांपर्यंत मजल गाठली. त्यामध्ये नमन ओझा याने केलेल्या नाबाद ७९ धावांचा मोठा वाटा होता. विजयासाठी षटकामागे दहा धावांचे लक्ष्य वरकरणी अवघड वाटत होते. तरीही वृद्धिमान साहा (५४) व ग्लेन मॅक्सवेल (४३) यांच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर पंजाबने १८.४ षटकांतच २११ धावा करीत विजय मिळविला.
संक्षिप्त धावफलक
सनरायझर्स हैदराबाद : २० षटकांत ५ बाद २०५ (नमन ओझा नाबाद ७९, शिखर धवन ४५, डेव्हिड वॉर्नर ४४; ऋषी धवन २/४२) पराभूत वि. किंग्ज इलेव्हन पंजाब : १८.४ षटकांत ४ बाद २११ (वृद्धिमान साहा ५४, मनन व्होरा ४७, ग्लेन मॅक्सवेल ४३, जॉर्ज बेली नाबाद ३५; अमित मिश्रा १/३२)
पंजाबचा हैदराबादवर सहा विकेट्सने विजय
फटक्यांच्या आतषबाजींच्या शर्यतीत किंग्ज इलेव्हन पंजाबने सनरायझर्स हैदराबादवर सहा विकेट व आठ चेंडू शिल्लक असताना सरशी मिळवली.
First published on: 15-05-2014 at 05:41 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunrisers hyderabad vs kings xi punjab ipl