गेल्या वर्षी ‘स्पॉट-फिक्सिंग’चा ठपका बसलेला राजस्थान रॉयल्सचा संघ नव्या कर्णधारासह नव्याने स्पर्धा खेळण्यासाठी उतरत असून हे नवे गडी नवे राज्य स्थापणार का, याकडेच साऱ्यांचे लक्ष असेल. तर दुसरीकडे शिखर धवनचा सनराजर्स हैदराबादचा संघ तळपण्यासाठी सज्ज आहे. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात विजयानिशी सुरुवात करण्यासाठी राजस्थान आणि हैदराबाद हे दोन्ही संघ आतुर असतील.
एस. श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांना गेल्या वर्षीच ‘स्पॉट-फिक्सिंग’च्या आरोपांमुळे संघातून बडतर्फ करण्यात आले होते. त्याचबरोबर माजी कर्णधार राहुल द्रविडनेही गेल्या हंगामात निवृत्ती पत्करल्याने तोही संघात नसेल. त्यामुळे संघाचा नवीन कर्णधार शेन वॉटसनवर मोठी जबाबदारी असेल. राजस्थानला या वेळी अजिंक्य रहाणेकडून मोठी अपेक्षा असेल. फलंदाजीमध्ये अजिंक्य आणि वॉटसनबरोबर ब्रॅड हॉज, संजू सॅमसन, स्टुअर्ट बिन्नी, जेम्स फॉल्कनर यांच्याकडे साऱ्यांचे लक्ष असेल. गोलंदाजीमध्ये ४२ वर्षीय प्रवीण तांबे पुन्हा आपली चमक दाखवेल का, याबाबत उत्सुकता असेल.
पहिल्याच मोसमात हैदराबादने चौथा क्रमांक मिळवला होता, या वेळी शिखर धवनकडे कर्णधारपद असल्याने संघाच्या प्रगतीचा आलेख किती चढतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. फलंदाजीमध्ये शिखर, डेव्हिड वॉर्नर आणि वेणुगोपाल राव हे नावाजलेले फलंदाज आहेत. पण हैदराबादचा संघ फलंदाजीपेक्षा गोलंदाजीवर अधिकाधिक सामने जिंकू शकतो. कारण त्यांच्याकडे डेल स्टेनसारखा तोफखाना आहे, इरफान पठाण, भुवनेश्वर कुमार आणि इशांत शर्मा स्टेनला साथ देतील. सध्या फॉर्मात असलेला अमित मिश्रा आणि स्थानिक खेळाडूंमध्ये सर्वाधिक बोली पटकावणारा करण शर्मा हैदराबादच्या ताफ्यात आहेत.
सनराजयर्स हैदराबाद तळपण्यासाठी सज्ज
गेल्या वर्षी ‘स्पॉट-फिक्सिंग’चा ठपका बसलेला राजस्थान रॉयल्सचा संघ नव्या कर्णधारासह नव्याने स्पर्धा खेळण्यासाठी उतरत असून हे नवे गडी नवे राज्य स्थापणार का, याकडेच साऱ्यांचे लक्ष असेल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 18-04-2014 at 12:46 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunrisers hyderabad vs rajasthan royals ipl 2014 preview familiar but tweaked line ups looking for early momentum