चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध रविवारी प्राप्त केलेल्या रोमहर्षक विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ‘प्ले-ऑफ’मध्ये स्थान मिळवण्याच्या आशा बळावल्या आहेत. आता मंगळवारी सनरायजर्स हैदराबादला हरवून आपले गुण वाढविण्याच्या प्रयत्नांत बंगळुरूचा संघ असेल.
रविवारी कोलकाता नाइट रायडर्सकडून हार पत्करल्यानंतर हैदराबादच्या बाद फेरीत पोहोचण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. परंतु तरीही ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ या आविर्भावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध विजय मिळवण्यासाठी हैदराबादचा संघ उत्सुक आहे. बंगळुरूचा संघ दरवर्षीप्रमाणे दिमाखात वावरताना यंदा दिसत नाही. परंतु ए बी डी’व्हिलियर्स, युवराज सिंग आणि ख्रिस गेल यांना गवसलेला सूर संघासाठी यशदायी ठरत आहे. परंतु तरीही कर्णधार विराट कोहलीच्या फॉर्मची संघाला चिंता आहे. गोलंदाजीच्या विभागात बंगळुरूची मदार आहे ती मिचेल स्टार्कवर आणि अनुभवी फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनवर.
सनरायजर्स हैदराबादच्या संघाच्या कामगिरीत यंदाच्या मोसमात सातत्याचा कमालीचा अभाव जाणवला. घरच्या मैदानावर त्यांना सलग तीन सामन्यांत अपयश आले आहे. शिखर धवन, आरोन फिंच, नमन ओझा आणि लोकेश राहुल यांच्याकडून अधिक जबाबदारीने फलंदाजीच्या अपेक्षा आहेत. त्या सार्थ ठरवल्या तरच हा संघ उत्तरार्धात आपली छाप पाडू शकेल.

Story img Loader