आयपीएलच्या ‘प्ले ऑफ’मध्ये स्थान निश्चित करुन हैदराबाद संघाने एक पाऊल पुढे टाकले आहे. आता संघाला पुढील सामन्यांसाठी तयार रहावे लागेल असे सनरायजर्स हैदराबाद संघाचे प्रशिक्षक टॉम मूडी यांनी स्पष्ट केलंय. सनरायजर्सने काल (रविवार) कोलकाता संघावर पाच बळी राखून विजय प्राप्त करत ‘प्ले ऑफ’ सामन्यांसाठीच्या तालिकेत आपले स्थान निश्चित केले. सामना संपल्यानंतर टॉम मूडी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, “हे विजयाच्या दृष्टिकोनातून टाकलेले एक पाऊल आहे, ‘प्ले ऑफ’च्या गुणतालिकेत स्थान मिळविण्याचे आमचे लक्ष्य होते आणि ते आम्ही प्राप्त केले. आता त्यानुसार आम्हाला तयारी करावी लागेल आणि त्यासाठी काही दिवसांचाच अवधी आहे.” तसेच “ही मालिका सुरू होण्यापूर्वी सनरायजर्स संघाकडून क्रिकेटरसिकांच्या कोणत्याही आशा नव्हत्या पण, आता ‘प्ले ऑफ’मध्ये स्थान प्राप्त केल्यानंतर चांगल्या कामगिरीसाठीच्या अपेक्षा वाढल्या आहेत. संघातील खेळाडू एकत्रितरित्या चांगली सांघिक कामगिरी करत आहेत”, असंही मूडी म्हणाले
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा