जमैकाचा ऑलिम्पिक विजेता युसेन बोल्ट याची जगातील सर्वोत्तम धावपटूच्या किताबावर नाव कोरले. आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघातर्फे दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारावर महिलांमध्ये अ‍ॅलिसन फेलिक्सने मोहोर उमटवली.
लंडन ऑलिम्पिकमध्ये १०० व २०० मीटर धावण्याची शर्यत जिंकणाऱ्या बोल्टने यापूर्वी २००८, २००९ व २०११ मध्ये हा किताब मिळविला आहे. त्याने यंदा हा पुरस्कार पुन्हा मिळविताना हर्डल्सचा विश्वविजेता एरियस मेरीट व धावपटू डेव्हिड रुडिशा यांना मागे टाकले.
बोल्ट व फेलिक्स यांनी २००३मध्ये जगातील सर्वोत्तम उदयोन्मुख धावपटूचा पुरस्कार मिळविला होता. फेलिक्सने लंडन ऑलिम्पिकमध्ये २०० मीटर धावण्याची शर्यत जिंकली होती. त्याआधी तिने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये चार रौप्यपदके मिळविली होती. महिलांमध्ये न्यूझीलंडची गोळाफेकपटू व्हॅलेरी अ‍ॅडॅम्स व इंग्लंडची हेप्टॅथलॉनपटू जेसिका इनिसा यांचीही नावे चर्चेत होती. फेलिक्सने या दोन्ही खेळाडूंना मागे टाकले.

Story img Loader