वेस्टइंडिजमधील पोर्ट ऑफ स्पेन स्टेडियमवर रंगलेल्या तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात शेवटच्या षटकात पहिल्या चार चेंडूत कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सोळा धावा ठोकल्या आणि भारताने तिरंगी मालिका जिंकली. श्रीलंका संघाला २०१ धावांवर गुंडाळण्यात भारतीय संघाला यश आल्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना १६७ धावांवर आठ बाद अशी भारतीय संघाची बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु, धोनी मैदानात असल्यामुळे  प्रतिस्पर्धीच्या बाजूला झुकलेला सामना खेचून आणण्याचे धोनीचे कसब पुन्हा एकदा भारतीय प्रेक्षकांना  पहावयास मिळाले. शेवटच्या षटकात जिंकण्यासाठी पंधरा धावांची गरज असताना धोनीने पहिल्या चार चेंडूंमध्ये दोन षटकार व चौकार लगावत सामना जिंकला.  धोनीने सामन्यात नाबाद ४५ धावा केल्या. धोनी सामनावीर तर, भुवनेश्वर कुमार मालिकावीर पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा