भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) २९ सप्टेंबरला चेन्नईला होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांना उपस्थित राहण्यास मनाई करावी, अशा आशयाच्या बिहार क्रिकेट संघटनेचे सचिव आदित्य वर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे, असे मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. शुक्रवारी या प्रकरणी सुनावणी होणार आहे, असे न्यायमूर्ती ए. के. पटनायक यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने म्हटले आहे. या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यात यावी, अशी विनंती बंगाल क्रिकेट असोसिएशनने केली होती.

Story img Loader