काही दिवसांपूर्वी सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा-द राइज‘ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सिनेमागृहांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच या चित्रपटाचे संवाद आणि गाणी सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. पुष्पा चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ हे गाणे सर्वसामान्यांच्या पसंतीस उतरले असून, क्रिकेटपटूंनाही हे गाणे आवडले आहे. या गाण्यात केलेली हुक स्टेपही सर्वांना आवडली. टीम इंडियाचा माजी फलंदाज सुरेश रैनाने या गाण्यावर ठेका धरला, त्याने डान्सचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडिओमध्ये सुरेश रैना त्याच्या कुटुंबातील दोन सदस्यांसह ‘श्रीवल्ली’ गाण्याची हुक स्टेप करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत सुरेश रैनाने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘मी हे गाणे करण्यापासून स्वत:ला रोखू शकलो नाही. अल्लू अर्जुन भाई, पुष्पा चित्रपटात तुम्ही किती छान काम केले आहे. मी तुम्हाला खूप यशासाठी शुभेच्छा देतो.’ अल्लू अर्जुननेही सुरेश रैनाचा हा व्हिडिओ पाहिला आणि कमेंट करताना ‘ग्रेट’ असे लिहिले.

हेही वाचा – Video : ‘पुष्पा’तील सामी सामी गाण्यावर डेव्हिड वॉर्नरच्या मुलींनी केला भन्नाट डान्स

अलीकडेच डेव्हिड वॉर्नरने पुष्पा चित्रपटाच्या या ट्रेंडिंग गाण्यावरील हुक स्टेपचा व्हिडिओ अपलोड केला आहे, ज्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली आहे. डेव्हिड वॉर्नरने ‘श्रीवल्ली’ गाण्याच्या हुक स्टेप कॉपी करून डान्स केला आहे. व्हिडिओ अपलोड करताना डेव्हिड वॉर्नरने लिहिले, ‘पुष्पा झाले, आता पुढे काय करायचे?’ या हुक स्टेपवर भाष्य करताना पुष्पा चित्रपट अभिनेता अल्लू अर्जुननेही त्याचे कौतुक केले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suresh raina and family doing srivalli pushpa step allu arjun replied adn