भारतीय संघाचा माजी फलंदाज सुरेश रैना आता नव्या स्टाईलमध्ये दिसणार आहे. कारण रैनाने पुस्ताकातून बॅटिंग केली आहे. सुरेश रैनाचे ‘Believe: What Life and Cricket Taught Me’ हे आत्मचरित्र प्रकाशित झाले. यापुर्वी त्याने ट्विटरवरुन ही माहिती दिली होती. त्याने एक व्हिडिओ शेअर केला होता यामध्ये रैना आपल्या पुस्तकावर सही करताना दिसत आहे. यामध्ये त्याने लीहले होते की, “माझे ‘Believe’ हे पुस्तक १४ जूनला प्रकाशित होईल. आशा आहे की तुम्हाला ते वाचण्यात आनंद होईल.”
धोनीबरोबरच्या बाँडिंगबद्दल सुरेशने आपल्या पुस्तकात लिहिले आहे. पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी इतरही अनेक रंजक गोष्टी समोर आणल्या आहेत. मी टीम इंडियामध्ये खेळलो, याचे कारण लोकं धोनीला देतात. मात्र, धोनीच्या मैत्रीमुळे मी टीम इंडियामध्ये इतके दिवस खेळलो असं नाही. मी फक्त माझ्या मेहनत आणि कामगिरीच्या जोरावर टीम इंडियामध्ये खेळू शकलो, असे रैना म्हणाला.
My book ‘believe’ will be out on 14th June .. Hope you have a great time reading it! believe
Order your copy on PenguinIndia amazon Flipkart pic.twitter.com/QclfwMGiIT— Suresh Raina
धोनीबाबत रैना म्हणाला
“धोनीच्या मैत्रीमुळे मी टीम इंडियामध्ये इतके दिवस खेळलो असं नाही. मी फक्त माझ्या मेहनत आणि कामगिरीच्या जोरावर टीम इंडियामध्ये खेळू शकलो. माझ्याकडून उत्तम कामगिरी कशी करुन घ्यावी, हे धोनीला माहित होते आणि मलाही त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. जेव्हा धोनीशी असलेल्या मैत्रीमुळे मी टीम इंडियामध्ये खेळलो, असे लोकं बोलतात तेव्हा खूप त्रास होतो. टीम इंडियामध्ये माझे स्थान निर्माण करण्यासाठी मी नेहमीच परिश्रम घेतले आहेत. कठोर परिश्रमातूनच मी धोनीचा विश्वास आणि आदर जिंकला”, असे रैना म्हणाला.
गांगुलीने नव्हे तर राहुल द्रविडने बनवली टीम
भारतीय क्रिकेट आज ज्या स्थितीत आहे त्याचे श्रेय माजी कर्णधार सौरव गांगुली यांना दिले जाते. असं म्हणतात की त्याने या संघाचा पाया रचला आणि बाहेर जिंकण्याची सवय लावली, विश्वचषक -२०११ विजयाचा भाग असलेला डावखुरा फलंदाज सुरेश रैनाच्या म्हणण्यानुसार टीम गांगुलीने नव्हे तर राहुल द्रविडने बनवली होती.
रैना म्हणाला, “जेव्हा लोक १०-१५ वर्षांत विकसित झालेल्या भारतीय संघाबद्दल बोलतात तेव्हा त्याचे श्रेय धोनी आणि आधीच्या गांगुली यांना दिले जाते की दोघांनीही संघ बनविला आणि भारतीय संघाला पुढे नेले. मी याशी पूर्णपणे सहमत नाही. दादाने ही टीम बनविली असे मी कधीही म्हटले नाही. त्याने आणि धोनीने संघाचे नेतृत्व केले आणि तो प्रभाव पाडला, हे खरं आहे, पण तिन्ही फॉर्मेटमध्ये संघ बनवण्याचे श्रेय राहुल द्रविडलाच जाते.”