माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाचे वडील त्रिलोक चंद रैना यांचे आज रविवारी निधन झाले. ते दीर्घकाळ कर्करोगाशी झुंज देत होते. गाझियाबाद येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रैनाचे वडील ऑर्डिनन्स फॅक्टरीत काम करायचे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुरेश रैनाने १५ ऑगस्ट २०२० रोजी महेंद्रसिंह धोनीसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धोनीने १५ ऑगस्ट रोजी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला, त्याच्यासोबतच रैनाही निवृत्त झाला. रैनाने भारतासाठी १८ कसोटी, २२६ एकदिवसीय सामन्यांव्यतिरिक्त एकूण ७८ टी-२० सामने खेळले आहेत.

हेही वाचा – ‘‘जेव्हा सचिननं मला पहिल्यांदाच म्हटलं होतं आई…”, लतादीदींनी सांगितला होता भावूक किस्सा!

त्रिलोक चंद रैना यांनी रविवारी गाझियाबादमधील राजनगर येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने क्रिकेट जगताला दु:खी आहे. त्रिलोक चंद रैना हे भारतीय लष्करात कार्यरत होते. त्यांचे मूळ गाव जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील रैनावरी आहे. १९९०च्या दशकात काश्मिरी पंडितांच्या हत्येनंतर रैनाच्या वडिलांनी गाव सोडले होते.

यानंतर त्रिलोक चंद रैना गाझियाबादमधील मुरादनगर येथे आले. त्यांना दोन मुले दिनेश आणि सुरेश आणि दोन मुली आहेत. सुरेश रैनाने ३ एप्रिल २०१५ रोजी प्रियंकासोबत लग्न केले. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. काश्मिरी पंडित त्रिलोकचंद रैना यांनी आपल्या मुलांचे संगोपन करण्यासाठी खूप कष्ट घेतले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suresh raina father trilok chand raina passes away adn
Show comments