भारताचा माजी स्टार फलंदाज सुरेश रैना निवृत्तीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर गेला असला, तरी त्याचे क्रिकेटवरील प्रेम आणि आवड कमी झालेली नाही. सुरेश रैना अबुधाबी येथे पार पडलेल्या टी-१० लीग २०२२ मध्ये तो सहभागी झाला होता. या स्पर्धेत तो प्रतिनिधीत्व करत असलेल्या डेक्कन ग्लॅडिएटर्स सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. आता सुरेश रैना मायदेशी परतला असून त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो खुपच व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आयपीएलमधील चमकदार कामगिरीमुळे सुरेश रैनाला मिस्टर आयपीएल असेही म्हटले जाते. त्याने आयपीएलमध्ये अनेक विक्रम केले आहेत. पण आता त्याने आयपीएलला अलविदा केला असून तो जगातील कोणत्याही लीगमध्ये खेळण्यास मोकळा आहे. दरम्यान, सुरेश रैनाने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो आपल्या चाहत्यांसोबत चप्पल घालून क्रिकेट खेळत असल्याचे दिसत आहे.

सुरेश रैनाने व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये सुरेश रैना चप्पल घालून फलंदाजी करताना दिसत आहे. मिस्टर आयपीएल मातीच्या खेळपट्टीवर तो स्थानिक मुलांसोबत क्रिकेट खेळत आहे. यादरम्यान रैनाने स्थानिक मुलांसोबत क्रिकेट खेळताना दिसत आहे.

हेही वाचा – Aryaveer Sehwag: दिल्ली क्रिकेट संघात निवड होताच, वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा व्हिडिओ होतोय व्हायरल, पाहा

अबुधाबी टी-१० लीगमध्ये सुरेश रैनाच्या डेक्कन ग्लॅडिएटर्सने अंतिम सामना नेत्रदीपक पद्धतीने जिंकला. अंतिम सामन्यात डेक्कन ग्लॅडिएटर्सने न्यूयॉर्क स्ट्रायकर्सचा ३७ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना डेक्कन ग्लॅडिएटर्सने १० षटकांत ४ गडी गमावून १२८ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूयॉर्क स्ट्रायकर्सला ५ विकेट्स गमावून केवळ ९१ धावा करता आल्या. या सामन्यात रैना विशेष काही करू शकला नाही आणि केवळ ७ धावा करुन बाद झाला.