Suresh Raina Restaurant: माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना हा त्याच्या काळातील सर्वात विस्फोटक फलंदाजांपैकी एक आहे. भारतासाठी टी२० मध्ये पहिले शतक झळकावणारा रैना जेव्हाही मैदानात फलंदाजीला यायचा तेव्हा धावांची भूक लागली होती. मात्र, रैना त्याच्या शॉट निवडीबाबत जितका सतर्क आणि परफेक्ट होता, तितकेच त्याने खाण्यापिण्यावर आणि चवीकडे लक्ष दिले आहे. कदाचित हेच कारण असेल की देशातील सर्वात चपळ क्षेत्ररक्षकांपैकी एक असलेला रैना क्षेत्ररक्षण करताना पूर्वीसारखा आपल्या सर्वांना फिट दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सुरेश रैनाने रेस्टॉरंट व्यवसायात आपली नवी इनिंग सुरू केली आहे. रैनाने नेदरलँड्समधील अ‍ॅमस्टरडॅममध्ये एक रेस्टॉरंट सुरू केले आहे, जिथे तो देशी खाद्यपदार्थांची चव सर्व खवय्यांना चाखायला देणार आहे. रैनाने त्याच्या इंस्टाग्रामवर अनेक फोटो शेअर करून आपल्या नव्या इनिंगची माहिती दिली आहे. क्रिकेट व्यतिरिक्त रैनाला वेगवगळे पदार्थ करण्याचा देखील शौक आहे. तो अनेकदा त्याचे कुकिंगचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो.

सुरेश रैनाने लिहिले आहे की, “अ‍ॅमस्टरडॅममधील रैना इंडियन रेस्टॉरंटची ओळख करून देताना मला खूप आनंद होत आहे, जिथे माझी खाण्याची आणि स्वयंपाकाची आवड मी अधिक जोपासू शकतो. सर्वोत्कृष्ट पदार्थ तयार करून लोकांना खाऊ घालता येतील हा माझ्यासाठी खूप विलक्षण अनुभव असणार आहे. गेल्या काही वर्षांत तुम्ही माझे खाण्याबद्दलचे प्रेम पाहिले आहे आणि माझ्या स्वयंपाकासंबंधीच्या साहसांचे कौतुकही केले आहे. भारताच्या विविध भागांतून अगदी अस्सल आणि चविष्ट पदार्थांचा स्वाद थेट युरोपमध्ये देणे हे माझे ध्येय आहे.”

माजी डावखुरा फलंदाज रैना पुढे म्हणाला, “आम्ही एकत्र मिळून आज एका नवीन कार्याला सुरुवात करत आहोत. या स्वादिष्ट, रुचकर पदार्थ लवकरच तुमच्या भेटीला येतील यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो. माझ्या साहसाला सुरुवात करत असताना या विलक्षण प्रवासात माझ्यासोबत सामील व्हा. वेगवेगळे रोमांचक अपडेट्स, तुमच्या तोंडाला पाणी आणणाऱ्या पदार्थांची झलक चाखण्यासाठी तयार राहा. रैना इंडियन रेस्टॉरंटच्या भव्य अनावरणासाठी झाले असून सर्वांच्या सेवेत आता आम्ही हजर झालो आहोत.”

हेही वाचा: Sarfaraz Khan: “…रणजी ट्रॉफी बंद करून टाका”, सरफराज खानला टीम इंडियात संधी न दिल्याने सुनील गावसकर BCCIवर संतापले

३६ वर्षीय रैना हा टॉप ऑर्डरचा आक्रमक फलंदाज होता. त्याने भारतासाठी १८ कसोटी, २२६ एकदिवसीय आणि ७८ टी२० सामने खेळले आणि सर्व फॉरमॅटमध्ये मिळून ७,०००हून अधिक धावा त्याने केल्या. २००८ ते २०२१ दरम्यान तो आयपीएल स्पर्धेच्या प्रत्येक मोसमात खेळला. मात्र, २०२० मध्ये ही स्पर्धा यूएईमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि रैनाने ही आयपीएल मध्येच सोडली होती आणि तो मायदेशी परतला. रैनाने २०५ आयपीएल सामने खेळले आहेत आणि नाबाद शतकासह ५५०० हून अधिक धावा केल्या आहेत. हा भारतीय क्रिकेटपटू आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात लायन्सकडून खेळला असून देशांतर्गत स्पर्धांमध्ये उत्तर प्रदेश संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suresh raina opens restaurant in netherlands capital amsterdam cooks himself sharing emotional photo avw