Suresh Raina Predictions About Shivam Dube : माजी दिग्गज क्रिकेटर सुरेश रैनाने अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात आपल्या स्फोटक खेळीने टीम इंडियाला विजय मिळवून देणाऱ्या शिवम दुबेबाबत मोठे वक्तव्य केले आहे. शिवम दुबेने आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन केले, तर तो यावर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकात चांगली कामगिरी करेल आणि टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडूही होऊ शकेल, असे त्याने म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात शिवम दुबेने चांगली फलंदाजी केली. त्याने अवघ्या ४० चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६० धावा केल्या. तो शेवटपर्यंत नाबाद राहिला आणि टीम इंडियाला विजयाकडे नेल्यानंतरच तो परतला. शिवम दुबेला त्याच्या उत्कृष्ट खेळीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

आयपीएलमध्ये सर्वांच्या नजरा शिवम दुबेवर असतील –

कलर्स सिनेप्लेक्सवरील संवादादरम्यान सुरेश रैनाने शिवम दुबेबद्दल मोठे वक्तव्य केले. तो म्हणाला, “एमएस धोनी त्याचा कसा वापर करतो हे पाहण्यासाठी या आयपीएलमध्ये सर्वांच्या नजरा शिवम दुबेवर असतील. जर त्याने आयपीएलच्या दोन महिन्यांत चांगली कामगिरी केली, तर टी-२० विश्वचषकात त्याची प्लेअर ऑफ द टूर्नामेंट निवड झाली, तर आश्चर्य वाटायला नको. शिवम दुबेची खास गोष्ट म्हणजे तो चौथ्या क्रमांकापासून ते सातव्या क्रमांकावर कुठेही फलंदाजी करू शकतो. याशिवाय कॅरेबियन आणि अमेरिकन भूमीवर सामने खेळवले जातील तेव्हा त्याचा ‘स्लोअर वन’ खूप प्रभावी ठरू शकतो.”

हेही वाचा – IND vs AFG : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू

शिवम दुबे आयपीएलमध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेकडून गेल्या काही हंगामात खेळत आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्जसाठी चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला भारतीय संघातही स्थान मिळाले. शिवम दुबेच्या म्हणण्यानुसार, चेन्नई सुपर किंग्जमध्ये खेळताना त्याने एमएस धोनीकडून सामना कसा संपवायचा याबद्दल बरेच काही शिकला आहे.

हेही वाचा – Israel Gaza Conflict : इस्रायलला पाठिंबा देणाऱ्या डेव्हिड टिगरला द. आफ्रिकेने कर्णधारपदावरून हटवले

भारताने अफगाणिस्तानवर सहज विजय मिळवला –

शिवम दुबेच्या (नाबाद ६०) अर्धशतकाच्या जोरावर तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा पराभव केला. भारताने अफगाणिस्तानचा ६ गडी आणि १५ चेंडू राखून पराभव केला. यासह त्यांनी तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.अनुभवी मोहम्मद नबी आणि युवा अजमतुल्ला ओमरझाई यांच्यात ४३ चेंडूत ६८ धावांच्या भागीदारीमुळे अफगाणिस्तानने पाच गडी गमावून १५८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने १७.३ षटकांत चार गडी गमावून लक्ष्य गाठले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suresh raina said about shivam dube that he will be the best player in t20 world cup 2024 vbm