सुरेश रैना हा क्रिकेटसोबतच त्याच्या गाण्सायाठी देखील ओळखला जातो. त्याला अनेक प्रसंगी गाताना ऐकले आहे. यावेळी त्यांनी स्वत:च्या आवाजात एक गाणे रेकॉर्ड केले आहे. त्याने गिटारसह एक गाणे गायले आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
खरंतर सुरेश रैनाने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो गिटार वाजवत आहे आणि एक गाणेही गात आहे. एक प्रसिद्ध गाणे तो स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करत आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिले, ”मैदानावर चेंडू हिट करण्याव्यातिरिक्त मी काही नोट्स देखील हिट करु शकतो असे तुम्हाला वाटते का? नुकताच हा सुंदर ट्रॅक ऐकला आणि तुम्हा सर्वांसोबत शेअर करण्याचा विचार केला. तुम्हाला तो आवडेल अशी आशा आहे.”
त्याचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. त्याची पत्नी प्रियंका रैनाने कमेंट विभागात हार्ट इमोजी तयार केला आहे. त्याचवेळी क्रिकेटर राहुल शर्माने ‘पाजी लव्ह इट’ असे लिहिले. त्याचबरोबर रॉबिन उथप्पानेही त्याच्या गाण्याचे कौतुक केले आहे.
या सर्वांमध्ये त्याच्या पोस्टवर गायक सलमान अलीनेही मजेशीर कमेंट केली आहे. तो म्हणाला, ‘अरे भाऊ, आमच्या पोटावर कशाला लाथ मारतोय.’
त्याचबरोबर चाहतेही यावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. तो म्हणतो की, रैनाने क्रिकेटनंतर गायनाचा व्यवसाय करावा. त्याच्या एका चाहत्याने लिहिले की, तुम्ही करू शकत नाही असे काही आहे का?
रैनाने नुकताच त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो भारतीय संघाला टी२० वर्ल्ड कपसाठी शुभेच्छा देताना दिसत आहे. तुम्ही तुमचे 100 टक्के द्या, तुम्ही नक्कीच चषक घरी आणू शकाल, असे त्यांनी संघातील खेळाडूंना सांगितले.