आयपीएलमधील राजकोट या फँ्रचायझीने गुजरात लायन्स असे आपल्या संघाचे नामकरण केले असून कर्णधारपदी भारताचा डावखुरा फलंदाज सुरेश रैनाची निवड केली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज ब्रॅड हॉज हा संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळणार आहे. या वर्षी आयपीएल स्पर्धा ९ एप्रिल ते २९ मे या कालावधी दरम्यान रंगणार आहे.
चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघांवर बंदी घातल्यानंतर इंटेक्स टेक्नोलॉजिस या कंपनीने राजकोटची फ्रँचायझी विकत घेतली होती. त्यानंतर लिलावाच्या वेळी त्यांनी रैनाला प्रथम प्राधान्य दिले होते. रैनाबरोबर या संघात रवींद्र जडेजा, जेम्स फॉकनर आणि ड्वेन ब्राव्हो हे नावाजलेले खेळाडू आहेत. रैनाला संघाचे कर्णधारपद मिळेल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. कारण न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलमही या संघात आहे. त्याने न्यूझीलंडचे दमदार नेतृत्व केले असून त्याच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडेल, असे काही जणांना वाटत होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा