Suresh Raina Uncle Son Died in Hit And Run Case: भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या मामाच्या मुलाचा हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील रस्ते अपघातात मृत्यू झाला. या अपघातात एकूण दोन जणांनी आपला जीव गमवावा लागला आहे. अपघातानंतर आरोपी चालक घटनास्थळावरून फरार झाला. पण त्याला आता मंडी येथून पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा सध्या कसून तपास केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कांगडा येथील गग्गल विमानतळाजवळील गग्गल पोलीस ठाण्याअंतर्गत हे हिट अँड रन प्रकरण समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी फरार टॅक्सी चालकाचा पाठलाग करून त्याला मंडी येथून अटक केली. बुधवारी रात्री ११.३०च्या सुमारास गग्गल येथील हिमाचल टिंबरजवळ अज्ञात टॅक्सी चालकाने स्कूटीला धडक दिली. स्कूटीला धडक दिल्यानंतर चालक घटनास्थळावरून पळून गेला.

Sachin Tendulkar Cryptic post about Steve Bucknor
Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या ‘त्या’ पोस्टने चाहत्यांच्या वाईट आठवणी झाल्या ताज्या, ‘हा’ अनुभवी अंपायर पुन्हा आला चर्चेत
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Tilak Verma scores centuries in two consecutive T20 matches in South Africa
Tilak Varma : ‘…मी कल्पनाही केली नव्हती’, विक्रमी शतकानंतर तिलक वर्माने देवासह ‘या’ खेळाडूचे मानले आभार
Sanju Samsons six hits fan
Ind vs SA: संजू सॅमसनच्या षटकाराने चाहती घायाळ
KL Rahul Injured in Intra Squad Match Simulation Session Perth Walks Off Field for Scanning Ahead Border Gavaskar Trophy IND vs AUS
IND vs AUS: भारताला पर्थ कसोटीपूर्वी मोठा धक्का, केएल राहुलला सराव सामन्यात दुखापत, सोडावं लागलं मैदान!
anshul kamboj
१० पैकी १० विकेट्स! अंशुल कंबोजचा रणजी स्पर्धेत विक्रम
Tilak Verma becomes 2nd youngest player to score a T20I century for India
Tilak Verma : तिलक वर्माने वादळी शतक झळकावत घडवला इतिहास, भारतासाठी ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे

हेही वाचा- T20 World Cup मधील टीम इंडियाचे सामने भारतीय वेळेनुसार किती वाजता खेळवले जाणार? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

या अपघातात स्कूटी चालक सौरभ कुमार (२७) आणि शुभम यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सौरभ हा गग्गल येथील तर शुभम हा कुठमान येथील रहिवासी होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या आधारे गग्गल पोलिसांनी आरोपी शेरसिंग याला वाहनासह जिल्हा मंडी येथून अटक केली आहे. सुरेश रैन्नाचे आजोळ गग्गल येथे आहे.

अपघाताची माहिती देताना कांगडा येथील एसपी शालिनी अग्रीहोत्री यांनी सांगितले की, मंगळवारी रात्री गग्गल पोलिस स्टेशन अंतर्गत हिट अँड रनचे प्रकरण समोर आले आहे. या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. गागल येथील सौरभ आणि बनोई येथील शुभम अशी मृतांची नावे आहेत. या तरुणांना धडक देऊन वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी फरार चालकाचा पाठलाग केला. त्याला मंडी येथून ताब्यात घेण्यात आले आणि त्याला पुन्हा कांगडा येथे आणले जात आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.