भारतीय संघातील हसतमुख खेळाडू, ‘चॉकलेट बॉय’ आणि हजारो तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेला सुरेश रैना अखेर लग्नाच्या बेडीत अडकला. कुटुंब सदस्य आणि काही जवळच्या मित्रांच्या साक्षीने शनिवारी भारताचा आघाडीचा फलंदाज सुरेश रैना त्याची बालपणीची मैत्रीण प्रियांका चौधरीशी विवाहबद्ध झाला. कोणताच गाजावाजा न करता रैनाने अगदी मोजक्याच लोकांच्या साक्षीने विवाह सोहळा पार पाडला. २८ वर्षीय रैना आणि सध्या नेदरलँडमध्ये काम करत असलेली प्रियांका यांच्यामध्ये बालपणापासून मैत्री होती. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रियंकाचे वडील रैनाचे क्रीडा प्रशिक्षक होते. रैनाच्या लग्न समारंभात भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी व त्याची पत्नी साक्षी, मोहित शर्मा, उमेश यादव, इरफान पठाण, ड्व्ॉन ब्राव्हो, मायकेल हसी आणि स्टीफन फ्लेमिंग या क्रिकेटपटूंसह आयसीसीचे कार्यकारी अधिकारी एन. श्रीनिवासन हेही उपस्थित होते. कुस्तिपटू सुशीलकुमारनेही यावेळी उपस्थिती लावली.

Story img Loader