Suresh Raina predicting Bumrah and Kuldeep will be trump cards: भारताचा माजी फलंदाज सुरेश रैनाला विश्वास आहे की, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ पुढील महिन्यात मायदेशात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत नक्कीच चॅम्पियन ठरेल. २०११ विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा भाग असलेल्या रैनाने सांगितले की, जर भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला तर ते कोणाविरुद्ध खेळणार याने काही फरक पडणार नाही. तसेच सुरेश रैनाच्या मते मायदेशत विश्वचषक जिंकून आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याची सुवर्णसंधी असणार आहे.

इंग्लंडमध्ये २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपासून भारताने एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. या वर्षाच्या सुरुवातीला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) फायनल गमावल्यानंतर, रोहित आणि त्याचा संघ १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादमध्ये प्रतिष्ठित ट्रॉफी उचलण्याचे लक्ष्य ठेवणार आहे.

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
IND vs AUS 3rd Test Match Timing Date Venue What Time Does the Gabba Test Start
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया गाबा कसोटी पहाटे किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या योग्य वेळ
IND vs AUS 3rd Test Rain to Play Spoilsport in Brisbane Weather Update India WTC Qualification
IND vs AUS: ब्रिस्बेनमधील पाऊस आणणार भारताच्या WTC फायनलच्या शर्यतीत अडथळा, गाबा कसोटी रद्द झाली तर काय होणार?
Mumbaikars await cold weather
थंडी पुन्हा कमी होण्याची शक्यता?
minimum temperatures in north Maharashtra
Maharashtra Weather Update : थंडीत आणखी वाढ होणार ? जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रासाठीचा अंदाज
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित
Rahu Gochar 2025
Rahu Gochar 2025 : राहु बदलणार चाल, पडणार पैशांचा पाऊस! ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य

बुमराह आणि कुलदीप ट्रम्प कार्ड ठरु शकतात –

शुक्रवारी टाइम्स ऑफ इंडियाच्या एका कार्यक्रमात सुरेश रैनाला विचारण्यात आले की, विश्वचषकाच्या फायनल सामन्यात भारताविरुद्ध कोणता संघ असेल. यावर बोलताना सुरेश रैना म्हणाला, “कोणीही येऊ ध्या, बघून घेऊ.” यानंतर सुरेश रैनाने टीम इंडियाबद्दल एक भाकीतही केले. रैनाला वाटते की वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फिरकीपटू कुलदीप यादव हे मायदेशात होणाऱ्या स्पर्धेत भारताचे ट्रम्प कार्ड असू शकतात. मात्र, विश्वचषकादरम्यान भारताची टॉप ऑर्डर कशी कामगिरी करते यावर बरेच काही अवलंबून असेल, असे रैनाने सांगितले.

हेही वाचा – Asia Cup Final 2023: पावसामुळे ‘IND vs SL’ फायनल रद्द झाली तर कसा ठरणार विजेता? जाणून घ्या काय असेल संपूर्ण समीकरण

सुरेश रैना पुढे म्हणाला, ‘विराट कोहली आणि शुबमन गिल यांनी चांगली कामगिरी केली, तर आपल्याकडे खूप चांगली मिडल ऑर्डर आहे. आपल्याकडे हार्दिक पांड्या, इशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर आहेत. पहिल्या तीन फलंदाजांना विशेषत: विराट कोहलीला चांगली कामगिरी करावी लागेल. तो धोकादायक खेळाडू आहे. तो सध्या चांगली फलंदाजी करत आहे. जर तो ३५-४० षटके टिकला तर आपल्याल चांगली संधी असेल.’

हेही वाचा – IND vs SL: ‘…म्हणून बांगलादेशविरुद्ध भारताचा पराभव झाला’; कर्णधार रोहित शर्माने सांगितले कारण

५ ऑक्टोबरपासून विश्वचषक स्पर्धेला होणार सुरुवात –

एकदिवसीय विश्वचषक ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. टीम इंडियाचे खेळाडू यासाठी मेहनत घेत आहेत. १२ वर्षांनंतर भारताने पुन्हा एकदा विश्वविजेता व्हावे, अशी भारताच्या करोडो चाहत्यांची इच्छा आहे. २०११ मध्ये, महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताला वनडे वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचा मान मिळाला होता. या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.

Story img Loader