प्रो-कबड्डीत हरियाणा स्टिलर्स या संघाकडून खेळणारा कबड्डीपटू सुरजित सिंह रस्ते अपघातातून थोडक्यात बचावला आहे. मंगळवारी सकाळी ही घटना घडली आहे. सुरजितने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याविषयी माहिती देत आपल्या चाहत्यांना आपण सुखरुप असल्याचं सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात सुरजित सिंह हा सर्वोत्कृष्ठ चढाईपटूंपैकी एक मानला जात होता. पदार्पणात हरियाणाच्या संघाकडून खेळताना सुरजितने अनेक सामन्यांमध्ये मोठ्या संघांना पराभूत करण्यात मोठा हातभार लावला होता. याआधी तिसऱ्या आणि चौथ्या पर्वात सुरजित दबंग दिल्ली पाटणा पायरेट्स संघाकडून खेळला होता. चौथ्या पर्वात पाटणा पायरेट्सकडून खेळताना सुरजित सिंहने प्रो-कबड्डीचं विजेतेपद पटकावलं होतं. ३१ जानेवारीपासून हैदराबादमध्ये राष्ट्रीय कबड्डी विजेतेपद स्पर्धा सुरु होत आहे. या स्पर्धेत सुरजित आता भाग घेऊ शकणार आहे.