Suryakumar Yadav Anniversary Post: भारताच्या टी २० विश्वचषकातील विजयात सिंहाचा वाटा असणारा हिरो म्हणजे सूर्यकुमार यादव. पण सूर्या दादा केवळ मैदानातच नाही तर इन्स्टाग्रामवर सुद्धा GOAT आहे, असं आम्ही नाही हो, चाहते म्हणतायत! आज, ८ जुलैला सूर्यकुमार यादवने पत्नी देविशा शेट्टीसह काही गोड फोटो शेअर करत लिहिलेल्या पोस्टने नेटकऱ्यांचं मन जिंकलं आहे. २९ जूनला भारताला दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध विजय मिळवून देताना घेतलेल्या सगळ्यात मोलाच्या कॅचचा संदर्भ देत सूर्याने एक भन्नाट कॅप्शन लिहिले आहे, जे वाचून नेटकरी सूर्या दादाची वाहवा करतायत. नेमकं या पोस्टमध्ये लिहिलंय काय, शिवाय पोस्टचं औचित्य काय हे पाहूया..

सूर्यकुमार यादवने ७ जुलै २०१६ ला देविशा शेट्टी हिच्यासह लग्नगाठ बांधली. काल म्हणजेच ७ जुलै २०२४ ला या जोडप्याच्या लग्नाचा आठवा वाढदिवस होता. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सूर्या व देविशा मुंबईतील बॅस्टिअन ॲट द टॉप या रेस्टॉरंटमध्ये सेलिब्रेशनसाठी पोहोचले होते. तुम्हाला माहीतच असेल, शिल्पा शेट्टीच्या मालकीचं कोहिनूर टॉवर्स येथील ४८ व्या माळ्यावर असणारं ‘बॅस्टिअन ॲट द टॉप’ हे सध्या ‘एस्थेटिक्स’ मुळे सर्वच सेलिब्रिटींना भुरळ पाडत आहे. काही दिवसांपूर्वीच सोनाक्षी सिन्हा व झहीर खान यांच्या लग्नाचे रिसेप्शनसुद्धा बॅस्टिअन येथेच झाले होते.

Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
Supriya Sule At Press Conference.
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, “नैतिकता सांभाळून धनंजय मुंडेंनी राजीनामा….”
Vaibhavi Deshmukh Demand For Justice
Maharashtra News Updates : “पप्पांना रस्त्यावरून उचललं, आता काकाला…”, संतोष देशमुखांच्या लेकीचा सरकारवर संताप
Devendra Fadnavis and Sharad Pawar (1)
Sharad Pawar : बीडप्रकरणी शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; म्हणाले, “राजकारणात मतभेद असतील-नसतील, पण…”
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”
Sudhir Mungantiwar Devendra Fadnavis (1)
निमंत्रण पत्रिकेत शेवटी नाव, मुनगंटीवार नाराज? फडणवीस खुलासा करत म्हणाले, “आम्ही वाघ व वारांचा…”

तर झालं असं की, लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आज सूर्याने आपल्या इंस्टाग्रामवर कालचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. यात त्याने कॅप्शन लिहिलंय की, “मी सगळ्यात महत्त्वाची कॅच घेऊन काल (७ जुलै) ला आठ दिवस झाले पण माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची कॅच मी ८ वर्षांपूर्वीच झेलली होती. 8 years ago, ∞ years to go.” बार्बाडोस येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या षटकात मिलरची विकेट काढणाऱ्या कॅचचा संदर्भ देत सूर्याने लिहिलेलं हे मजेशीर पण कमाल रोमँटिक कॅप्शन वाचून नेटकरी खुश झाले आहेत.

दरम्यान या पोस्टमध्ये सूर्यकुमारचं कॅप्शनच नाही तर त्याच्या लुकची सुद्धा चर्चा होतेय. सूर्याने छान पिवळ्या रंगाचं प्रिंटेड शर्ट घातलंय तर देविशा लाल रंगाच्या गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसतेय.

सूर्यकुमार यादव व देविशा मागील आठ वर्षांपासून एकत्र आहेत. देविशा अलीकडे अनेक सामन्यांच्या वेळी सूर्याला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियममध्ये दिसून आली आहे. विश्वचषकानंतर सुद्धा देविशा व सूर्याने बेडवर ट्रॉफीसह पोज करत एक फोटो पोस्ट केला होता.

हे ही वाचा<< सूर्यकुमारने कॅच घेताना सीमारेषेचा ब्लॉक शूजने ढकलला का? हा ठोस पुरावा पाहून टीकाकारांचं तोंड होईल बंद, पाहा Video

दुसरीकडे, टी २० विश्वचषकातील सूर्याने घेतलेली कॅच एक आठवडा उलटल्यावर सुद्धा चर्चेतच आहे. डेव्हिड मिलरने हार्दिक पांड्याच्या शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर लाँग-ऑफच्या दिशेने सीमारेषेकडे चेंडू भिरकावला होता, अशक्य वाटणारा झेल घेत सूर्यकुमारने संघाला सामना जिंकवून दिला होता. गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या विधानभवनात जेव्हा खेळाडूंचा सत्कार झाला तेव्हा सूर्याने तो कॅच हातात बसला असं म्हणत आपला साधेपणा दाखवला होता. त्यावेळेस कर्णधार रोहित शर्माने मात्र “बरं झालं कॅच हातात बसला नाही तर मीच तुला बसवलं असतं असं म्हणत” सूर्याला चिमटा घेतला होता.

Story img Loader