Suryakumar Yadav breaks Virat Kohli’s record for sixes in T20I : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सूर्यकुमार यादवने अप्रतिम इनिंग खेळली आणि शतक झळकावले. या सामन्यात सूर्यकुमार यादवने ५६ चेंडूत ८ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने १०० धावांची खेळी केली आणि संघाची धावसंख्या २०१ धावांपर्यंत नेण्यात मोठी भूमिका बजावली. यानंतर कुलदीप यादवने दक्षिण आफ्रिकेच्या पाच फलंदाजांना आपल्या फिरकीच्या गळाला लावत विजयावर शिक्कामोर्तब केला. या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवने विराट कोहलीचा एक विक्रम मोडला.
आपल्या डावात मारलेल्या या आठ षटकारांच्या जोरावर सूर्यकुमार यादवने विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडीत काढला. आता तो भारतासाठी टी-२० फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या सामन्यात सूर्यकुमारने प्रथम २५ चेंडूत २७ धावा केल्या होत्या आणि त्यानंतर ३१ चेंडूत ७३ धावा केल्या.
सूर्यकुमार यादवने विराट कोहलीला टाकले मागे –
सूर्यकुमार यादवने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या १२०० धावांच्या खेळीत ८ षटकार मारले. या षटकारांच्या मदतीने तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. सूर्यकुमार यादवने याआधी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर ढकलले. कोहलीने टी-२० मध्ये भारतासाठी १०७ डावात एकूण ११७ षटकार मारले होते, मात्र आता सूर्यकुमार यादवने ५७ डावात १२३ षटकार मारत त्याला मागे टाकले आहे. भारतासाठी टी-२० मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज रोहित शर्मा आहे, ज्याने १४० डावात एकूण १८२ षटकार मारले आहेत.
हेही वाचा – IND vs SA T20 : भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाच्या पदकावर ‘या’ खेळाडूने कोरले नाव
टी-२० मध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज –
१८२ षटकार – रोहित शर्मा (१४० डाव)
१२३ षटकार – सूर्यकुमार यादव (५७ डाव)
११७ षटकार – विराट कोहली (१०७ डाव)
९९ षटकार – केएल राहुल (६८ डाव)
७४ षटकार – युवराज सिंग (५१ डाव)
सूर्यकुमारच्या नावावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एका डावात सर्वाधिक षटकारांचा विक्रम –
सूर्यकुमार यादव हा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० सामन्याच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. या संघाविरुद्धच्या सामन्यात त्याने ८ षटकार मारून हा पराक्रम केला. तथापि, क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटमध्ये कोणत्याही संघाविरुद्ध एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे, ज्याने २०१७ साली श्रीलंकेविरुद्ध १० षटकार मारले होते.
हेही वाचा – T20 World Cup 2024 : ठरलं! ‘या’ शहरात रंगणार भारत-पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला
भारतासाठी एका टी-२० डावात सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज –
१० – रोहित शर्मा विरुद्ध श्रीलंका, इंदूर, २०१७
९ – सूर्यकुमार यादव विरुद्ध श्रीलंका, राजकोट, २०२३
८ – केएल राहुल विरुद्ध श्रीलंका, इंदूर, २०१७
८ – सूर्यकुमार यादव विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग, २०२३