Suryakumar Yadav breaks Rohit Sharma’s two records: प्रोव्हिडन्स स्टेडियमवरील झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने शानदार पुनरागमन करत सामना ७ गडी राखून जिंकला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने दमदार खेळी केली, जी आतापर्यंत वेस्ट इंडिज दौऱ्यावर दिसली नव्हती. या सामन्यात सूर्यकुमारने ४४ चेंडूत ४ षटकार आणि १० चौकारांच्या मदतीने ८३ धावा करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात सूर्याने ४ षटकार मारून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० षटकार पूर्ण केले. त्याचबरोबर रोहित शर्माचा एक मोठा विक्रम मोडला, तर तिलक वर्माने सूर्यकुमार यादवच्या विक्रमाशी बरोबरी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूर्यकुमारने मोडला रोहित शर्माचा विक्रम –

भारताकडून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात १०० षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आता सूर्यकुमार यादव पहिल्या क्रमांकावर आला आहे. यापूर्वी हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता, ज्याने ८४ डावांमध्ये १०० षटकार मारले होते, मात्र आता सूर्यकुमार यादवने ४९ डावांमध्ये हा पराक्रम केला आहे. एकूणच, ४९ डावात १०० षटकार मारणाऱ्या ख्रिस गेलसोबत सूर्यकुमार यादव आता संयुक्त दुसऱ्या क्रमांकावर आहे. सूर्यकुमार यादवच्या नावावर आता टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५१ सामन्यांत १०१ षटकार आहेत.

टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वात कमी डावात १०० षटकार मारणारे फलंदाज –

४२ – एविन लुईस
४९ – सूर्यकुमार यादव
४९ – ख्रिस गेल
५७ – कॉलिन मुनरो
७० – आरोन फिंच
७२ – मार्टिन गप्टिल
८४ – रोहित शर्मा<br>८६ – ग्लेन मॅक्सवेल<br>८७ – इऑन मॉर्गन
८७ – जोस बटलर

सूर्यकुमारला टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये रोहितपेक्षा अधिक सामनावीर पुरस्कार –

सूर्यकुमार यादवने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १२व्यांदा सामनावीराचा किताब जिंकला आणि रोहित शर्माला मागे टाकले. भारताकडून टी-२० फॉरमॅटमध्ये सर्वाधिक सामनावीराचा किताब पटकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो आता दुसऱ्या क्रमांकावर आला आहे, तर हिटमॅन तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. या यादीत विराट कोहली पहिल्या स्थानावर आहे.

टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणारे खेळाडू –

विराट कोहली – १५
सूर्यकुमार यादव – १२
रोहित शर्मा – ११

हेही वाचा – IND vs WI 3rd T20: ‘निकी हे ऐकेल…’, विजयानंतर प्रतिक्रिया देताना हार्दिक पांड्या असं का म्हणाला? घ्या जाणून

सामन्याबद्दल बोलायचे, या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने ५ गडी गमावून १५९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने १७.५ षटकांत तीन गडी गमावून १६४ धावा करून सामना जिंकला. वेस्ट इंडिजकडून ब्रेंडन किंगने ४२(४२) आणि रोव्हमन पॉवेलने ४०(१९) धावा केल्या. त्याच वेळी, अल्झारी जोसेफने गोलंदाजीत दोन बळी घेतले. त्याचवेळी भारताकडून प्रथम कुलदीप यादवने तीन बळी घेतले, त्यानंतर सूर्यकुमार यादवने ८३(४४) आणि तिलक वर्माने नाबाद ४९(३७) धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suryakumar yadav broke rohit sharmas record of fastest 100 sixes in ind vs wi 3rd t20 vbm