Suryakumar Yadav On Virat Kohli : आशिया चषकासाठी २१ ऑगस्टला टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. आशिया चषक झाल्यानंतर वनडे वर्ल्डकप २०२३ चा थरार क्रिकेटच्या मैदानात रंगणार आहे. अशातच भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीवर तमाम क्रिकेटप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत. भारताचा कर्णधार रोहित शर्मा गेल्या काही दिवसांपासून विश्रांतीचा आनंद घेत आहे. भारत-वेस्टइंडिजच्या वनडे सीरिजमध्ये रोहित सहभागी झाला होता आणि आता २ सप्टेंबरला आशिया चषकात पाकिस्तान विरोधात होणाऱ्या सामन्यात रोहित अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे.
परंतु, अशा मोठ्या टूर्नामेंटच्या आधी फावळा वेळ मिळाल्याने विराट कोहली कंबर कसत असल्याचं एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम हॅंडलवर विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्माचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. ही पोस्ट इंटरनेटवर व्हायरल होताच कोहलीचा सहकारी सूर्यकुमार यादवने भन्नाट प्रतिक्रिया दिलीय.
नक्की वाचा – Asia Cup 2023: टीम इंडियाला ‘ती’ चूक पडणार महागात? गौतम गंभीरच्या विधानामुळे उडाली खळबळ
यादवने टिप्पणी करत म्हटलंय, भाई, धावण्याची पद्धत थोडी हलक्या स्वरुपाची वाटत आहे. कोहलीच्या चाहत्यांनीही या पोस्टवर प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. पाकिस्तानचा माजी गोलंदाज आकिब जावेदनंही यूट्यूब चॅनेल इव्हेंट्स अॅंड हॅपनिंग्स स्पोर्ट्सवर म्हटलंय, कोहलीचे सीजन अद्भूत आहेत. जर एका हंगामात तो अद्भूत आहे, तर दुसऱ्या हंगामात चित्र वेगळं असू शकतो. तो बाबर आझमसारखा स्थिर नाहीय.