आयपीएल २०२३ सुरू होण्यासाठी अजून काही महिने बाकी आहेत. मात्र सर्व संघांनी त्याची तयारी सुरू केली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या लिलावात सर्व संघांनी अनेक खेळाडूंना खरेदी करून आपल्या संघात समाविष्ट केले होते. अलीकडेच मुंबई इंडियन्सने त्यांच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये संघाचा सर्वोत्तम फलंदाज सूर्यकुमार यादव आणि देवाल्ड ब्रेविस यांच्यात व्हिडिओ कॉल संभाषण झाले आहे.
या व्हिडिओ चॅटद्वारे सूर्यकुमार यादव आणि डेवाल्ड ब्रेविस यांच्यात अनेक गोष्टी घडल्या. दोघांनी आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाशी संबंधित अनेक किस्से एकमेकांसोबत शेअर केले. दरम्यान, सूर्याने ब्रेविसला विचारले की तिलक वगळता त्याला मुंबई इंडियन्सच्या कुटुंबाची आठवण येते का? कारण तिलक वर्मा आणि देवाल्ड हे खूप चांगले मित्र आहेत. तर ब्रेविसने उत्तर देऊन म्हटले की होय, मला संपूर्ण मुंबई इंडियन्स कुटुंबाची आठवण येते. मी तिलकाकडून खूप काही शिकलो, त्यामुळे मला त्याची खूप आठवण येते.
हेही वाचा – Suryakumar Yadav: ‘लहानपणी फलंदाजी करताना पाहिले नसेल’, सूर्यासोबत फनी मूडमध्ये दिसला द्रविड, पाहा VIDEO
यासोबतच सूर्या बेबी एबीला सांगतो की, तो फलंदाजी करताना त्याची अनेकदा कॉपी करतो. तो जसा लांब शॉट्स खेळतो, तसाच तो शॉट्स खेळण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू म्हणतो की, मला आनंद वाटतो आणि मला अभिमानही वाटतो, पण नो लूक शॉट खेळण्यासाठी मी स्वत: तुमची अनेकदा कॉपी करतो.
भारत आणि श्रीलंका यांच्यात राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाने ९१ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २२८ धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ १३७ धावांवर ऑलआऊट झाला होता. टीम इंडियाकडून सूर्यकुमार यादवने ११२ धावा केल्या, तर अर्शदीप सिंगने ३ बळी घेतले. टीम इंडियाने तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली.