Suryakumar Yadav has been offered the captaincy by KKR for 2025 : आयपीएल २०२५ पूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. तत्पूर्वी गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सने मोठी चाल खेळली आहे. ताज्या रिपोर्टच्या माहितीनुसार, केकेआरने रोहित शर्माला नाही तर सूर्यकुमार यादवला कर्णधारपदाची अनधिकृत ऑफर दिली आहे. जर सूर्याने ही ऑफर स्वीकारली आणि केकेआर संघात परतला तर दोघांसाठीही हा करार फायदेशीर ठरू शकतो. मात्र, गतवर्षी केकेआर संघाने श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखाली जेतेपद पटकावले आहे. परंतु सूर्याचे आगमन संघात ‘एक्स फॅक्टर’ आणेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या वर्षभरापासून मुंबई इंडियन्सच्या संघात काहीही ठीक नसल्याची चर्चा सुरू आहे. एमआयने हार्दिक पंड्याला गुजरात टायटन्सकडून ट्रेड करून संघाचा कर्णधार बनवले होते. फ्रँचायझीच्या या निर्णयावर एमआयचे चाहते खूश नव्हते आणि संपूर्ण स्पर्धेत हार्दिक पंड्यावर मैदानात आणि मैदानाबाहेर टीका झाली. यानंतर बातमी आली की एमआय संघ दोन गटामध्ये विभागला गेला आहे.

सूर्यकुमार यादववर सर्वकाही अवलंबून –

मुंबई इंडियन्समध्ये रोहित शर्मानंतर सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांच्याकडे कर्णधार म्हणून पाहिले जात होते, पण संघाने हार्दिकवर ही जबाबदारी सोपवून सर्वांना धक्का दिला आहे. ज्यामुळे केकेआर आता एमआयच्या या कमकुवतपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. जर सूर्यकुमार यादवने कर्णधारपदाची ऑफर स्वीकारली तर केकेआर संघ त्याला एमआयकडून ट्रेड करु शकतो.

हेही वाचा – ENG vs SL : जो रूटने एकाच डावात मोडले दोन मोठे रेकॉर्ड, राहुल द्रविड आणि ॲलन बॉर्डरला टाकले मागे

केकेआर संघ श्रेयस अय्यरला ट्रेड करु शकतो –

जर सूर्यकुमार यादव केकेआरकडे आला तर संघ त्याला श्रेयस अय्यरसह ट्रेड करू शकेल, असा दावाही रिपोर्ट्समध्ये केला आहे. होय, हा निर्णय जरा आश्चर्यचकित करणारा आहे. कारण गेल्या वर्षी अय्यरच्या नेतृत्वाखाली संघ चॅम्पियन बनला होता. अशीही बातमी आहे की जर रोहित शर्माने मुंबई इंडियन्स सोडण्याचा निर्णय घेतला, तर दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स त्याला खरेदी करण्याचा विचार करत आहेत. डीसीकडे ऋषभ पंतच्या रूपाने चांगला कर्णधार आहे, पण त्यांच्याकडे सलामीच्या फलंदाजाची कमतरता आहे. एलएसजी नवीन कर्णधाराच्या शोधात आहे. कारण गेल्या वर्षी झालेल्या मतभेदानंतर केएल राहुल संघ सोडू शकतो.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suryakumar yadav has been offered the captaincy by kkr for the ipl 2025 season reports claim vbm