भारताच्या सूर्यकुमार यादवने जागतिक क्रिकेटमध्ये खूप नाव कमावले आहे. हा धडाकेबाज फलंदाज आयसीसी टी-२० क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला आहे आणि टी-२० विश्वचषकातील सर्वात मौल्यवान संघातही त्याचा समावेश झाला आहे. सूर्या आता आगामी भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यात चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. त्याच्या दौऱ्याच्या अगोदर, सूर्यकुमार आपल्या एका ट्वीटमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टी-२० विश्वचषकातील धक्कादायक उपांत्य फेरीतून बाहेर पडल्यानंतर टीम इंडिया १८ नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी सज्ज झाली आहे. सूर्यकुमार रविवारी वेलिंग्टनला पोहोचला आणि त्यांनी ट्विटरवर एक अपडेट शेअर केली. सूर्यकुमारने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, हॅलो वेलिंग्टन.

दरम्यान, महिला क्रिकेटपटू अमांडा-जेड वेलिंग्टनने सुर्याच्या पोस्टवर मजेदार प्रतिक्रिया दिली आहे. ‘हॅलो यादव’ असे लिहिले. वेलिंग्टनच्या सूर्यकुमार यादवसोबतची ही मस्ती सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सूर्यकुमार विश्वचषकात चांगल्या स्थितीत दिसत होता आणि २३९ धावांसह स्पर्धेतील तिसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. त्याने नेदरलँड, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेविरुद्ध तीन अर्धशतके झळकावली. त्याच्या या कामगिरीने टीम इंडियाला उपांत्य फेरीत नेले, पण चॅम्पियन इंग्लंडविरुद्ध अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. आगामी मालिकेत त्याला न्यूझीलंडविरुद्धचा फॉर्म कायम ठेवायचा आहे.

भारताचा स्टार फलंदाज आणि स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांचा सोमवारी आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ च्या ‘मोस्ट व्हॅल्यूड टीम’मध्ये समावेश करण्यात आला. कोहलीने या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आणि ९८.६६ च्या उत्कृष्ट सरासरीने २९६ धावा केल्या. सूर्यकुमार यादवने सिडनीमध्ये नेदरलँड्सविरुद्ध नाबाद ५१, पर्थमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६८ आणि मेलबर्नमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध अवघ्या २५ चेंडूत नाबाद ६१ धावांची संस्मरणीय खेळी खेळली. त्याचा स्ट्राइक रेट १८९.६८ होता.

हेही वाचा – इंग्लंडचे प्रशिक्षक मॅथ्यू मॉटचे स्टोक्सबाबत मोठे वक्तव्य: म्हणाला, ‘बेन वनडे क्रिकेट….!’

दुसरीकडे, वेलिंग्टन सध्या ऑस्ट्रेलियातील महिला बिग बॅश लीगमध्ये अॅडलेड स्ट्रायकर्सकडून खेळत आहे. लेग-स्पिनरने १० सामन्यांत ६.५९ च्या प्रभावी इकॉनॉमी रेटने १७ विकेट घेतल्या आहेत. तसेच, ती लीगमधील सर्वाधिक बळी घेणारी चौथी गोलंदाज आहे आणि तिने पाच विकेट्सही घेतल्या आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंडमध्ये २०२२ चा विश्वचषक जिंकणाऱ्या कर्णधार मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाचा वेलिंग्टन देखील महत्त्वाचा भाग होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suryakumar yadav hello wellington tweet gets hilarious reply from australian woman cricketer amanda wellington vbm