Suryakumar Yadav won the hearts of fans video viral : शुक्रवारी, वाँडरर्स क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ४ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथा सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने १३५ धावांनी दणदणीत विजय मिळवत मालिका ३-१ ने खिशात घातली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताना १ बाद २८३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात यजमान संघ १८.२ षटकांत १४८ धावांत गारद झाला. या सामन्यादरम्यान भारतीय कर्णधाराने असे काही केले ज्याने सर्वांची मनं जिंकली. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

वास्तविक, सोशल मीडियाचा सर्वात लोकप्रिय प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये टीम इंडिया जेव्हा दक्षिण आफ्रिकेची विकेट पडल्यानंतर आनंद साजरा करत असताना, तेव्हा रिंकू सिंगने घातलेली भारतीय कॅप मैदानात पडते. त्यावर कर्णधार सूर्याकडून चुकून पाय पडतो. यानंतर तो भारतीय कॅप उचलतो. यानंतर तो तिचे चुंबन घेतो आणि तिला रिंकूच्या स्वाधीन करतो. त्याच्या या कृतीने भारतीय चाहत्यांची मनं जिंकली, ज्याचा व्हिडीओ आता तुफान व्हायरल होत आहे

संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांच्या स्फोटक नाबाद शतकांच्या बळावर भारताने शुक्रवारी चौथ्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १३५ धावांनी विजय मिळवत मालिका ३-१ अशी जिंकली. सॅमसन (नाबाद १०९) आणि वर्मा (नाबाद १२०) यांच्यातील दुसऱ्या विकेटसाठी २१० धावांच्या विक्रमी भागीदारीमुळे भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना एका विकेटच्या मोबदल्यात १८३ धावांचा मोठा पर्वत उभारला होता. परदेशी भूमीवर आणि दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर कोणत्याही देशाकडून टी-२० आंतरराष्ट्रीय मधील भारताची ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

हेही वाचा – Tilak Varma : ‘माझा देवावर आणि….’, सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावल्यानंतर तिलक वर्माने आकाशाकडे का दाखवले बोट?

u

अर्शदीप सिंगच्या (२० धावांत ३ विकेट्स) शानदार सलामीच्या स्पेलमुळे दक्षिण आफ्रिकेने १० धावांत चार विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर पडझड सुरुच राहिली आणि संपूर्ण संघ १८.२ षटकांत १४८ धावांत गारद झाला. या सामन्यादरम्यान अनेक विक्रम मोडले गेले, त्यातील सर्वात महत्त्वाचा विक्रम म्हणजे एकाच टी-२० आंतरराष्ट्रीय डावात दोन भारतीय फलंदाजांनी शतके झळकावली.