Suryakumar Yadav made big mistake Axar Patel bowl just one over : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला ३ विकेट्सनी पराभवाला सामोरे जावे लागले. यासह आफ्रिकन संघाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी अत्यंत खराब कामगिरी केली. याचा परिणाम म्हणून भारताला सामना गमवावा लागला. प्रथम फलंदाजी करताना भारत केवळ १२४ धावाच करू शकला. यानंतर आफ्रिकेने हे लक्ष्य १९व्या षटकातच गाठले. फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई यांनी पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, परंतु सूर्यकुमार यादवच्या एका निर्णयाने सामन्याची दिशाच बदलली.

वरुण चक्रवर्तीने घेतल्या सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या –

फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या चमकदार कामगिरी केली. त्याने सामन्यात ५ विकेट्स घेतल्या आणि चार षटकांच्या कोट्यात केवळ १७ धावा दिल्या. याशिवाय रवी बिश्नोईनेही चार षटकांत २१ धावा देत १ विकेट घेतली. या दोन्ही खेळाडूंनी आफ्रिकन फलंदाजांवर अंकुश ठेवला आणि त्यांना मुक्तपणे फटकेबाजी करण्यापासून रोखले. एकेकाळी आफ्रिकेने ८६ धावांत ७ विकेट गमावल्या होत्या आणि सामना जिंकण्यासाठी संघर्ष करत होता. अशा परिस्थितीत टीम इंडिया इथून सामना जिंकेल, अशी सर्वांना अपेक्षा होती. खेळपट्टीकडून फिरकीपटूंना भरपूर मदत मिळत होती आणि भारतीय फिरकीपटू वर्चस्व गाजवत होते.

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rohit Sharma Practice With Mumbai Ranji Trophy Team at Wankhede Stadium
Rohit Sharma: रोहित शर्मा रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत, हिटमॅनने घेतला मोठा निर्णय; मुंबई संघासह…
Karun Nair ready to make a comeback to Indian team after scored 4 consecutive centuries in Vijay Hazare Trophy 2024-25
Karun Nair : त्रिशतकवीर आठ वर्षानंतर पुनरागमनासाठी सज्ज! सलग चार शतकं झळकावत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
IND W vs IRE W Jemimah Rodrigues century helps Indian womens team register highest ODI score against Ireland
IND W vs IRE W : जेमिमा रॉड्रिग्जच्या पहिल्यावहिल्या शतकाच्या जोरावर भारताने घडवला इतिहास, केला ‘हा’ खास पराक्रम
bjp plan to contest local bodies elections alone after huge success in assembly elections
भाजप शत-प्रतिशतकडे; शिर्डीच्या महाविजयी मेळाव्यात दिशादर्शन; शहांची उपस्थिती
Image of Indian Cricket Team
Ind vs Eng T20 Series : इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची निवड, तब्बल एक वर्षानंतर शमीचे पुनरागमन
Arshdeep Singh clean bowled to Ruturaj Gaikwad during MAH vs PUN match in Vijay Hazare Trophy 2025
Vijay Hazare Trophy : अर्शदीपचा अफलातून स्पेल! ऋतुराजचा त्रिफळा उडवत महाराष्ट्राच्या टॉप ऑर्डरला पाडली खिंडार, VIDEO व्हायरल

अक्षर पटेलने केवळ एकच षटक टाकले –

पण त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने मोठा निर्णय घेतला आणि वेगवान गोलंदाजांकडून १७वी, १८वी आणि १९वी षटके टाकून घेतली आणि इथून सामन्याची दिशा बदलली. विशेष म्हणजे त्यावेळी फिरकी गोलंदाज अक्षर पटेलची तीन षटके बाकी होती. याआधीच्या सामन्यात अक्षरने फक्त एकच षटक टाकले होते आणि त्यात त्याने दोन धावा दिल्या होत्या. अशा परिस्थितीत सूर्याने फिरकीला अनुकूल असणाऱ्या खेळपट्टीवर अक्षरला फक्त एकच षटक टाकण्याची संधी दिली हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तसेच वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग महागडा ठरला आणि त्याने चार षटकांत ४१ धावा दिल्या. तर आवेश खानने ३ षटकात २३ धावा दिल्या. डेथ ओव्हर्समध्ये वेगवान गोलंदाजांसह गोलंदाजी करण्याचा सूर्याचा निर्णय टीम इंडियाला महागात पडला आणि भारताला पराभवाला सामोरे जावे लागले.

हेही वाचा – IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे

u

हार्दिक पंड्याने केल्या सर्वाधिक धावा –

पहिल्या सामन्यातील शतकवीर संजू सॅमसनला दुसऱ्या सामन्यात खातेही उघडता आले नाही आणि अभिषेक शर्माही स्वस्तात बाद झाल्याने भारतीय संघाला मोठा धक्का बसला. यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवही ९ चेंडूत केवळ चार धावा करुन बाद झाला. टीम इंडियाकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक ३९ धावा केल्या. तर अक्षर पटेलने २७ धावांचे योगदान दिले. तिलक वर्माने २० धावांचे योगदान दिले. हार्दिक शेवटपर्यंत विकेटवर टिकून राहिला आणि त्याच्यामुळेच टीम इंडियाला १२४ धावा करण्यात यश आले.

Story img Loader